क्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्रमुंबई

भुसावळहून १० किमी रेल्वे ट्रॅकवर सापडल्या 3 AK 47 रायफल्स, रेल्वे ट्रॅक उडवण्याचा महिनाभरातील दुसरा कट उधळला ?

जळगाव दि-२८/१०/२४ – गेल्या आठवड्यात भुसावळ तालुक्यातील वरणगाव आर्डनन्स फॅक्टरीतून सहा AK 47 रायफली कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतांना चोरी झालेल्या होत्या. यामुळे स्थानिक सुरक्षा व्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं आहे. दरम्यान, आज सकाळी भुसावळ तालुक्यातील जाडगाव शिवारात असलेल्या रेल्वे ट्रॅकवर रेल्वे कर्मचारी ट्रॅक चेकिंगचे काम करत असताना त्यांना ट्रॅकवर 3 AK 47 रायफल्स आढळून आल्याने त्यांनी तात्काळ यांची सूचना लोहमार्ग पोलिसांना दिलेली आहे. घटनास्थळी लोहमार्ग पोलिसांसह स्थानिक पोलिसांनी कसून चौकशी सुरू केलेली असून या 3 रायफल्स या ट्रॅकवर रेल्वेचा मोठा घातपात घडवून आणण्यासाठीच ठेवल्या गेल्या असल्याचे प्राथमिक तपासात समोर आलेलं आहे. या घटनेमुळे केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सतर्क झालेल्या असून आयुध निर्माण येथील चोरी झालेल्या तपासकार्यात सक्रिय आहेत. घटनास्थळाच्या सभोवतालचा परिसर पिंजून काढला जात असून हा संवेदनशील विषय असल्याने गोपनीय पद्धतीने तपास केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांसह श्वानपथक घटनास्थळी येऊन तपास करत आहे.
एक महिन्यापूर्वी सापडले होते डिटोनेटर
भारतीय सैन्याच्या विशेष ट्रेनला डिटोनेटर बॉम्बने उडवण्याचा कट गेल्या महिन्याभरापूर्वी मध्यप्रदेशातील नेपानगर रेल्वे रूळालगत उघडकिस आल्याने भुसावळ रेल्वे विभागासह देशात मोठी खळबळ उडाली होती.या घटनेनंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) चे विशेष पथक दाखल झालेलं होतं.सोबतच मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्तपणे तपास करत एका रेल्वे कर्मचारी असलेल्या अभियंत्याला निलंबित केले होते. या गंभीर घटनेची तपास यंत्रणा अजूनही सखोल उच्चस्तरीय चौकशी करत आहेत.
 भुसावळ जंक्शनपासून १०-१५ किमी दूर रेल्वे ट्रॅकवर सापडल्या रायफल्स
मध्य रेल्वेचे मोठे जंक्शन असलेल्या भुसावळ रेल्वे स्थानकापासून अंदाजे 80 किलोमीटरवर मागील महिन्यात डिटोनेटर स्फोटाची घटना घडलेली आहे. त्यातच आता चक्क वरणगाव आर्डनन्स फॅक्टरीतून अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था भेदून चक्क सहा रायफल्स चोरी होऊन त्यांचा वापर रेल्वे ट्रॅकवर रेल्वे गाड्यांचा अपघात आणि मोठा घातपात घडवण्याच्या उद्देशाने समाजकंटकांनी ठेवल्याचा संशय असून भुसावळ जंक्शन हे आता दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आलेले आहे का ? असा मोठा प्रश्न या निमित्ताने समोर आलेला आहे.
   यापूर्वीच्या नेपानगर येथील घटना आणि आज सकाळी रेल्वे ट्रॅकमन आणि भुसावळ विभागातील रेल्वे अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे सुदैवाने मोठी दुर्घटना व जीवित हानी टळलेली आहे. या संवेदनशील घटनेचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button