भुसावळात भल्या पहाटे चहाचा घोट घेत असताना गोळीबार करून तरुणाची निर्घृण हत्या
खून झालेला खूनाचा संशयित आरोपी
भुसावळ दि-१०/०१/२०२५, शहरातील गजबजलेल्या जाम मोहल्ला भागातील भर चौकातील शालिमार हाॅटेल पुढे असलेल्या डिडि टी या चहाच्या दुकाना जवळ आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास एका तरूणावर चहा पीत असताना अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार करत पाच राऊंड फायर केलेले होते. यानंतर सदर जखमीला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गोळी लागलेला व्यक्ती हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली असून डॉक्टरांनी त्याची तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केलेले आहे.
दरम्यान, तहरीन नजीर शेख (वय ३०) रा.भुसावळ असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. भुसावळ शहरात यापूर्वी याच परिसरातील आफत पटेल नावाच्या तरुणाचा गेल्या वर्षी खून झाला होता. या खून प्रकरणातील तो एक संशयित आरोपी असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. दरम्यान आज शुक्रवारी दिनांक १० जानेवारी रोजी तहरीन सकाळी चहा पिण्यासाठी डीडी सुपर कोल्ड्रिक्स आणि चहा येथे चहा घेण्यासाठी आला होता. यावेळी संशयित चार ते पाच संशयित आरोपींनी त्याच्यावर बंदुकीतून पाच फैरी झाडल्या आहेत. भल्या पहाटे झालेल्या या गोळीबाराच्या घटनेने भुसावळ शहर पुन्हा एकदा हादरलेले असून, गजबजलेल्या जाम मोहल्ला भागातील या घटनास्थळी बाजारपेठ पोलीस ठाण्याचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असून बाजारपेठचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांचे सह मोठा फौजफाटा दाखल झालेला आहे. दरम्यान गोळीबार करून पसार झालेल्या आरोपींचा पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असून सीसीटीव्ही फुटेजची ही तपासणी करण्यात येत आहे.