भुसावळ दि-28/10/24, भुसावळ विधानसभा भाजपा व महायुती अधिकृत उमेदवार श्री.संजयजी सावकारे यांचा नामनिर्देशन अर्ज भाजपा नेते मंत्री गिरीष महाजन व केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दाखल करण्यात आलेला आहे.
जळगाव जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघासाठी आज बहुतेक उमेदवारांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024 अनुषंगाने उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.भुसावळ विधानसभासाठी भाजपा व महायुती चे अधिकृत उमेदवार श्री.संजयजी सावकारे यांनी आज भाजपा नेते गिरीष महाजन व केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे तसेच जिल्ह्यातील भाजपा व महायुतीचे प्रमुख पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते यांच्या उपस्थित आपला नामनिर्देशन अर्ज तहसिल कार्यालयात सादर केला आहे. यावेळी निघालेल्या मिरवणुकीत प्रचंड शक्तीप्रदर्शन करण्यात आलेले आहे.जवळपास 20000 मतदारांच्या भव्य उपस्थितीत भाजपचे उमेदवार संजय सावकारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला असल्याने या महाशक्ती प्रदर्शनाची सर्वत्र जोरदार चर्चा बघायला मिळत आहे. त्यामुळे विरोधकांनाही त्याच तोडीचे शक्तीप्रदर्शन करावे लागणार आहे.
यावेळी भाजपा नेते गिरीष महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे व महायुती पदाधिकारी यांनी भव्य विजय दृढसंकल्प रॅली मध्ये सहभागी होऊन, सभेमध्ये उपस्थित जनसागरास संबोधित करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन करण्यासाठी महायुतीच्या सर्व उमेदवार यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी, प्रत्येक बुथवर जास्तीतजास्त मतदानसाठी प्रयत्न करण्याचे यावेळी आवाहन केले.यावेळी भाजपचे शहरासह तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडेंसह त्यांचे हजारो कार्यकर्ते, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शेकडो कार्यकर्ते, हजारो महिला स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते.
80 हजार मतांनी होणार विजय -मंत्री गिरीष महाजन
यावेळी जामनेर रोड येथील भुसावळ विधानसभा भाजपच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मंत्री गिरीश महाजन व केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी हजारो भाजपचे व महायुतीच्या कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, आमदार संजय सावकारे हे सलग चौथ्यांदा विजयी होणार असून यावेळी त्यांना तब्बल 80 हजार मतांचे मताधिक्य देखील मिळणार असल्याचा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केलेला आहे.