Advertisement
जळगावनिवडणूकमहाराष्ट्रमुंबईराजकीय

भुसावळ: वार्ड क्र.8 च्या उमेदवार अनिता सतीश सपकाळे व शारदा दिपक धांडे यांना मतदारांचा भरघोस प्रतिसाद , विजयाचा ठाम विश्वास

प्रभागाच्या विकासासाठी सदैव कटिबध्द

भुसावळ – नगरपरिषदेची रणधुमाळी आता रंगतदार वळणावर आलेली असून प्रभाग क्रमांक 8 ‘अ’ मधून भाजपच्या अनिता सतीश सपकाळे तर  ‘ब’ मधून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार शारदा दिपक धांडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला असून दररोज प्रभागातील मतदारांपुढे आर्शिवाद घ्यायला जात आहे. प्रभाग क्रमांक ८ मधील बहुसंख्य महिला व पुरुष उमेदवारांनी त्यांच्या सोबत प्रचार मिरवणुकीत स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला आहे.
दरम्यान, समाजसेवक सतीश सपकाळे आणि दिपक धांडे यांनी गेल्या काही वर्षांपासून प्रभागातील नागरिकांच्या विविध प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी अहोरात्र केलेल्या जनसेवेच्या प्रयत्नांच्या जोरावर मतदारांपुढे आर्शिवाद घ्यायला जात असून दोघांनी आपल्या सौभाग्यवतींच्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.
दरम्यान, काल झालेल्या प्रभागातील प्रचाराच्या मिरवणुकीत भाजपच्या उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष मनोज बियाणी यांनी उमेदवारांसह सहभाग घेतला होता. प्रभागातील प्रतिष्ठित शेकडो नागरिक, महिला व पुरुषांसह शेकडो मतदारांचा मोठा जनसमुदाय प्रचार मिरवणुकीत स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहे. शारदा दिपक धांडे यांच्या उमेदवारीमुळे या प्रभागातील मतदारांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झालेले आहे.
तसेच उमेदवार अनिता सतीश सपकाळे आणि शारदा दिपक धांडे या दोन्ही महिला उमेदवारांचे घरोघरी महिलांनी औक्षण करून जोरदार स्वागत केलेले आहे. यावेळी उमेदवार अनिता सतीश सपकाळे आणि शारदा दिपक धांडे यांनी मतदारांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत. तसेच सर्व प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले आहे. प्रभागातील प्रत्येक गल्लीत भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. रजनी संजय सावकारे यांनाही एक मत देण्यासाठी आवाहन करण्यात आलेले असून, मतदारांकडून याला भरघोस प्रतिसाद मिळालेला दिसून येत आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Back to top button