Advertisement
जळगावनिवडणूकराजकीय

भुसावळ: प्रभाग 5 मध्ये मध्ये अशोक पितांबर चौधरी ऊर्फ आऊभाऊ व उर्मिला रामदास सावकारे उमेदवारीचे तगडे आव्हान,प्रचाराला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद

भुसावळ : भुसावळ नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना प्रभाग क्रमांक 5 ‘अ’ मधून उर्मिला रामदास सावकारे आणि ‘ब’ मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अशोक पितांबर चौधरी ऊर्फ आऊभाऊ यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. मतदानाची तारीख जवळ येत असतानाच त्यांच्या प्रचाराने प्रभागात प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उच्चशिक्षित,संयमी,सुसंस्कृत आणि विश्वासू अशी ओळख असलेल्या अशोक पितांबर चौधरी यांनी जनतेच्या हक्कासाठी “ना जाती, ना पातीसाठी… माझी उमेदवारी फक्त आणि फक्त प्रभागाच्या विकासासाठी” असे ठाम ध्येय घेऊन मैदानात उतरल्या आहेत. त्यांच्या प्रचार मिरवणुकीला प्रभागातील महिला-पुरुष मतदारांचा स्वयंस्फूर्तीने उदंड प्रतिसाद मिळत आहे. घराघरात महिलांनी औक्षण करून त्यांचे जोरदार स्वागत केले जात आहे.


प्रचारादरम्यान प्रत्येक गल्लीत, प्रत्येक घरात जाऊन मतदारांच्या समस्या जाणून घेत आहेत आणि पाणी, रस्ते, स्वच्छता, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट अशा प्रलंबित प्रश्नांना प्राधान्य देऊन प्रभागाचा कायापालट करण्याचे ठोस आश्वासन देत आहेत. त्यांच्या या दमदार प्रचारामुळे प्रभागात नवचैतन्य निर्माण झाले असून मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड विश्वासाची भावना दिसून येत आहे.
प्रचार मिरवणुकीत प्रभागातील शेकडो नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत अनेक मान्यवर व कार्यकर्ते उत्साहाने सहभाग घेत आहेत. या सर्वांच्या अनमोल सहकार्यामुळे प्रचाराला अधिकच बळ मिळाले आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Back to top button