भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तक्रारी देऊनही कारवाई न झाल्याने जळगाव पाटबंधारे कार्यालयात आत्मदहनाचा इशारा
उलटा चोर कोतवाल को दाटे ?

जळगाव दि-०५/०४/२०२५, सामाजिक कार्यकर्ते संजय खन्ना यांनी जळगाव येथील पाटबंधारे विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई न झाल्याने आत्मदहनाचा इशारा दिलेला असून ते येत्या 11 एप्रिल रोजी जळगाव येथील पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात आत्मदहन करणार असल्याचे पत्र त्यांनी पाटबंधारे विभागाला दिलेले आहे. तापी पाटबंधारे संदर्भात वरीष्ठांना अनेक वेळा त्यांनी पुराव्यांसह तक्रार केलेली आहे. तसेच मंत्रालयात सुध्दा जावून वरीष्ठ अधिकारी यांच्याकडे जळगांव पाटबंधारे विभागात अनेक प्रकारचे गैरप्रकार होत असल्याची तक्रार दाखल केलेली आहे.परंतु गेल्या दोन ते अडीच वर्षा पासुन आतापर्यंत यासंदर्भात कोणत्याही प्रकारची कारवाई तापी पाटबंधारे विभागाकडून झालेली नाही. तसेच दोन वेळा जळगाव येथील तापी पाटबंधारे कार्यालय व सर्कल कार्यालयात ठिया आंदोलन केलेले आहे. तरी सुध्दा आज पावेतो कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. पुरावा असतांना ही आपल्या कार्यालया कडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच आपले दि.20/03/2025 रोजी चे पत्र दि.24/03/2025 चे पत्र मध्ये दिशाभुल उल्लेख करण्यात आलेले आहे. तसेच दि. 20/03/2025 मध्ये उल्लेख केलेला आहे की, विषयांकीत पत्र व्यवहार हा उपविभागीय पाटबंधारे सावदा व शाखाधिकारी हतनुर धरण यांचे मनोबल खच्ची करणे व मानसीक त्रास देणे अश्या प्रकारचे असलेले दिसून येत आहे. हे म्हणणे तुमचे चुकीचे आहे व हे मला मान्य नाही. उलट तुम्ही तुमच्या अधिकारीवर कारवाई न करता माझ्यावर आरोप करत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. तरी दि.10/04/2025 रोजी पर्यंत आपले पत्र क्र.883 दि.20/03/2025 चे माघार घ्यावी व माझेवर केलेले खोटे आरोप मागे घ्यावे. अन्यथा दि.11/04/2025 रोजी मी तापी पाटबंधारे मुख्य अभियंता कार्यालया समोर आत्मदहन करेल याची जबाबदारी आपल्या कार्यालयाची राहिल. मी वरीष्ठ नागरीक आहे. तसेच हृदयविकाराचा रुग्ण आहे. मला काही कमी जास्त झाल्यास तुम्ही जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी. तरी वरील विषयावर स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संजय खन्ना यांनी केली आहे.
आत्मदहन मागे घेण्याची विनंती
दरम्यान, तक्रारदार संजय खन्ना यांना आत्मदहन आंदोलन मागे घेण्याची विनंती संबंधित पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेली आहे. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन मिळूनही उचित कार्यवाही होत नसल्याने, खन्ना यांनी आपल्या आत्मदहनाच्या आंदोलनावर ठाम राहण्याची भूमिका कायम ठेवली आहे. यामुळे याकडे नागरिकांचे लक्ष केंद्रित झालेले आहे.