मतदारांच्या सकारात्मक उदंड प्रतिसादामुळे आमचा विजय निश्चित, संगिता प्रदिप देशमुख यांचा विश्वास

विकासकामांमुळे आणि मतदारांच्या उदंड प्रतिसादामुळे आमचा विजय निश्चित, संगिता देशमुख यांचा विश्वास
भुसावळ दि-२७/११/२५, नगरपरिषदेची निवडणूक आता रंगतदार वळणावर आलेली असून प्रभाग क्रमांक १८अ मधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार संगीता प्रदीप देशमुख यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी फित कापून केलेले आहे.
दरम्यान , महायुती सरकारच्या दूरदृष्टीमुळे भुसावळ शहरात झालेल्या विकासकामांमुळे आणि मतदारांच्या उदंड प्रतिसादामुळे आमचा विजय निश्चित असल्याचा विश्वास माजी नगरसेवक प्रदिप देशमुख यांनी व्यक्त केला आहे. याप्रसंगी प्रभाग क्रमांक १८ अ मधील महिला व पुरुषांसह शेकडो मतदारांचा मोठा जनसमुदाय प्रचार मिरवणुकीत सहभागी होता. यामुळे प्रभागात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झालेले आहे. संगिता देशमुख यांना मतदारांकडून उदंड प्रतिसाद मिळालेला दिसून येत आहे.













