महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर यांना मिळाली उमेदवारी
मुंबई ,दिनांक-20/10/2024, भारतीय जनता पक्षाने राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज उमेदवारांची यादी जाहीर केलेली असून यात गेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांसाठी ज्यांच्या विधानसभा मतदारसंघातून 10,000 च्या वर मताधिक्य कमी पडून लोकसभेच्या उमेदवारांच्या पराभवाला कारणीभूत असलेल्या काही विद्यमान आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातील विधानसभा मतदारसंघ यादी खालील प्रमाणे आहे. या यादीत उत्तर महाराष्ट्रातून या उमेदवारांना भाजपचे तिकीट मिळालेले आहेत. जळगाव जिल्ह्यातून कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांना जामनेर मतदार संघातून पुन्हा एकदा उमेदवारी मिळालेली असून भुसावळ विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार संजय सावकारे यांना उमेदवारी मिळाली आहे. तसेच जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून सुरेश भोळे यांना तर चाळीसगावमध्ये मंगेश चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी मिळालेली आहे.तसेच रावेर मतदार संघातून अमोल जावळे यांना यावेळी पक्षाने उमेदवारी जाहीर केलेली आहे.
1) नागपूर दक्षिण पश्चिम – देवेद्र फडणवीस
2) कामठी – चंद्ररशेखर बावनकुळे
3) शहादा (आजजा) – राजेश पाडवी
4) नंदुरबार (अजजा) – विजयकुमार गावीत
5) धुळे शहर – अनुप अग्रवाल
6) शिंदखेडा – जयकुमार रावल
7) शिरपूर (अजजा) – काशिराम पावरा
8) रावेर – अमोल जावळे
9) भुसावळ (अजा) – संजय सावकारे
10) जळगांव शहर – सुरेश भोळे
11) चाळीसगाव – मंगेश चव्हाण
12) जामनेर – गिरीश महाजन
13) चिखली – श्वेता महाले
14) खामगांव – आकाश फुंडकर
15) जळगांव (जामोद) – डॉ. संजय कुटे