” मी जर काही सांगितलं तर लोक त्यांना जोड्याने मारतील “, एकनाथ खडसेंच्या आरोपांवर गिरीश महाजनांची सडेतोड प्रतिक्रिया
खडसे -महाजनांमध्ये पुन्हा वाकयुद्धाची ठिणगी

जळगाव दि-०६/०४/२५, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केलेल्या आरोपांना आता मंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा सडेतोड उत्तरं दिलेलं आहे. “मी जर त्यांच्याबद्दल तोंड उघडलं तर लोक त्यांना बाहेर आल्यावर जोड्याने मारतील. एक-एक नंबरचे महाचोर आहेत. ते कमरेच्या खाली वार केल्याशिवाय त्यांना दुसरं काही जमत नाही. त्यांनी एक तरी पुरावा दाखवावा. मी सक्रिय राजकारणातून बाहेर पडेन.काहीतरी चारित्र्यहनन करायचं. याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काही राहिलेलं नाही. अमित शाह यांना काय पुरावा दाखवता, लोकांना दाखवा. यांना पुरावे दिले त्यांना दिले, माझ्या मोबाईलमध्ये होते डिलीट झाले. मोबाईल हरवला हे हे खोटं बोलताना लाज वाटत नाही का ? माझं आव्हान आहे, खडसेंनी एक पुरावा दाखवावा. माझा अंत बघू नका. मी जर एका गोष्टीचा खुलासा केला तर खडसे तोंड काळ करतील.त्यांच्या घरातलीच गोष्ट आहे पण मी बोलणार नाही मला बोलायला लावू नका”, माझा अंत पाहू नका”, असा खणखणीत इशाराही त्यांनी एकनाथ खडसे यांना दिला आहे. कमरेच्या खाली वार केल्याशिवाय त्यांना दुसरं काही जमत नाही. त्यांची अवस्था किती वाईट आहे हे महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे मी इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही. मला बोलायचं असेल तर निघणं मुश्किल होईल. त्यांचं सगळं संपलेलं आहे. त्यांचे दुकान बंद झालेलं आहे, त्यामुळे वाटेल तशी भाषा करतात आणि बरळतात. महाराष्ट्राला माहीत आहे मी काय आहे”, असं गिरीश महाजन म्हणाले. ते नेहमी म्हणतात की, पुरावे आहेत सीडी आहेत. मी वारंवार त्यांना आव्हान दिलं माझी सीडी लावा. पण ते लावू शकले नाही. त्यांचे जावई तीन वर्ष जेलमध्ये जाऊन आले होते. त्यांच्या पत्नीला मात्र महिला आहे म्हणून आम्ही जाऊ दिले. त्यांच्याबद्दल लवचिकता घेतली. विनाकारण कमरेखालची भाषा करायची, घाणेरडे बोलायचं. स्वतः नंबर एकचे महाचोर आहेत. सगळे धंदे त्यांचे लोकांना माहीत आहेत. मी जर त्यांच्याबद्दल एका गोष्टीची वाच्यता केली तर लोक त्यांना बाहेर आल्यावर जोड्याने मारतील”, असा घणाघात गिरीश महाजन यांनी केला आहे.
‘तर लोक त्यांना जोड्याने मारतील’
“ते ज्येष्ठ आहेत. वयाने मोठे आहेत. बोलताना त्यांनी माझ्या कामाबद्दल बोलावं, माझ्या भ्रष्टाचाराबद्दल बोलावं. जे सत्य असेल ते बोला. मात्र काही नसताना भोंदू पत्रकारांना खोट्या बातम्या द्यायच्या. वारंवार ते म्हणतात माझ्याकडे हे आहे ते आहे. मात्र कशासाठी ? ते अशाप्रकारे लोकांची दिशाभूल करतात. म्हणून काय असेल ते सांगावं. मात्र मी जर काही सांगितलं तर लोक त्यांना जोड्याने मारतील”, असं गिरीश महाजन सडेतोड म्हणालेले आहे.
एकनाथ खडसे नेमकं काय म्हणाले ?
गगनभेदी युट्युब चॅनेल चे पत्रकार अनिल थत्ते यांनी काल एक व्हिडिओ प्रसारित करून गिरीश महाजन यांच्या बाबतीत एक कथित गौप्यस्फोट केलेला होता. त्या संदर्भावरून खडसे यांनी त्यांची प्रतिक्रिया देत म्हटलेलं आहे की, गिरीश महाजन यांचे एका महिला IAS अधिकाऱ्यांशी संबंध असल्याचा दावा केलेला आहे. यावरून हा सगळा गदारोळ सुरू झालेला असून पुन्हा एकदा खडसे-महाजन वाद चिघळण्याची शक्यता आहे.