मुंबई मंत्रालयात वरिष्ठ IAS अधिकारी असलेल्या दाम्पत्याच्या मुलीने केली आत्महत्या
मंत्रालयातील अधिकारी वर्गात खळबळ
मुंबई, दि:3 जून, मुंबईतील मंत्रालयासमोरील एका शासकीय इमारतीत राहणाऱ्या एका वरिष्ठ IAS अधिकाऱ्याच्या 27 वर्षीय मुलीने राहत्या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्या करून जीवन संपवलेलं आहे. IAS अधिकारी विकास रस्तोगी आणि त्यांची पत्नी IAS राधिका रस्तोगी यांची ती मुलगी होती. लिपी विकास रस्तोगी असं आत्महत्या करणाऱ्या मुलीच नाव आहे. ती एलएलबीचे शिक्षण घेत होती. मध्यरात्री 3 च्या सुमारास ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. सरकारमधील एका मोठ्या उच्चपदस्थ अधिकारी असलेल्या दाम्पत्यांच्या मुलीने अशा प्रकारे आत्महत्या करून जीवन संपवून घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे.
दरम्यान, मंत्रालयासमोरच सुनीती नावाची बड्या अधिकाऱ्यांचे निवासस्थान असलेली इमारत आहे. तिथे 10 व्या मजल्यावर विकास रस्तोगी राहतात. या मुलीच्या आत्महत्येमागे काय नेमकं कारण आहे ? ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या या रहिवासी इमारतीत झालेल्या या घटनेने प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे. विकास रस्तोगी हे शिक्षण विभागात महत्त्वाच्या पदावर आहेत. आत्महत्या करणाऱ्या मुलीने 10 व्या मजल्यावरुन उडी मारल्यानंतर ती खाली उभ्या असलेल्या बाईकवर कोसळली. त्यावेळी तिचा जागीच मृत्यू झाला. मध्यरात्रीच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला. मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आलेला आहे. घटनास्थळी कफ परेड पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित आहे. विकास रस्तोगी शिक्षण विभागात सचिव आहेत तर त्यांच्या पत्नी राधिका रस्तोगी चलन विभागात सचिव आहेत. विकास रस्तोगी हे १९९७ च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. लिपी रस्तोगी ही अभ्यासात तितकीशी पुढे नव्हती. त्यामुळे ती नैराश्यात होती. आई-वडील इतके मोठे अधिकारी असून आपण त्यासाठी पात्र आहोत की नाही अशी भीती लिपी रस्तोगीला सतावत होती. त्यातूनच तिने आयुष्य संपवल्याची चर्चा मंत्रालय परिसरात चर्चा आहे. दरम्यान, सध्या पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.