Advertisement नंदग्राम गोधाम वाटरपार्क,अंजाळे
Railwayअर्थकारणक्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्रमुंबई

रेल्वे दक्षता पथकाने दोन तिकिट दलालांना केली अटक, १० लाखांपेक्षा जास्त किमतीची १८२ रेल्वे तिकिटे जप्त

भुसावळ दि-23/05/25, मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने विशिष्ट स्रोतांच्या माहितीवरून कारवाई करून, दिनांक २२ मे २०२५ रोजी मलकापूर येथील प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) कार्यालयात प्रतिबंधात्मक तपासणी केली. दक्षता पथकाने दलालीच्या कामात सहभागी असलेल्या दोन व्यक्तींना अटक केली.
तपासणी दरम्यान, पथकाने पीआरएस मलकापूर येथून खरेदी केलेले ३९६०/- रुपये किमतीचे वातानुकूलित तत्काळ तिकीट असलेल्या दोन व्यक्तींना ताब्यात घेतले. स्थानिक सूत्रधार संजय चांडक आणि १७ वर्षीय सहाय्यक प्रसाद काळे अशी या व्यक्तींची ओळख पटली. संजय चांडकने मुंबईतील कुख्यात दलाल ठाकूरशी संबंध असल्याचे उघड केले, जो व्यापक दलालीच्या नेटवर्कचा सूत्रधार असल्याचे मानले जाते.
अधिक चौकशी केल्यानंतर, संजय चांडक यांनी स्वतःहून मुंबईतील दलालला व्हॉट्सॲप चॅट ची हिस्ट्री शेअर केली, ज्यामध्ये असे दिसून आले की त्याने पीआरएस मलकापूर द्वारे बुक केलेल्या १८२ जेसीआर (जर्नी कम रिझर्वेशन) तिकिटांचे फोटो पाठवले होते. यामध्ये १,६१,५३५/- रुपये किमतीच्या २३ लाइव्ह तिकिटांचा आणि ८,४८,२९८/- रुपयांच्या १५९ जुन्या तिकिटांचा समावेश होता, ज्याची एकूण किंमत १०,०९,८३३/- रुपये होती त्यात या किमतीची १८२ तिकिटे होती. चांडक यांनी कबूल केले की ही तिकिटे बेकायदेशीर पुनर्विक्रीसाठी बुक करण्यात आली होती आणि मुंबईतील दलालला पुरवण्यात आली होती.
अटक केलेल्या दोन्ही दलालांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी मलकापूर येथील रेल्वे संरक्षण दलाच्या (आरपीएफ) निरीक्षकांकडे सोपवण्यात आले. रेल्वे कायद्याच्या कलम १४३ अंतर्गत सीआर क्रमांक २७८/२०२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रॅकेटमध्ये सहभागी असलेली २३ लाइव्ह तिकिटे ब्लॉक करण्यात आली आहेत. आरपीएफ मलकापूर कडून पुढील तपास सुरू आहे.
मध्य रेल्वे दक्षता विभाग बेकायदेशीर तिकीट व्यवहारांना आळा घालण्यासाठी आणि योग्यरित्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे सेवांमध्ये पारदर्शक आणि न्याय्य प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे.
दिनांक: २४ मे २०२५
प्रप क्रमांक: २०२५/०५/२३
सदर प्रसिद्धी पत्रक जनसंपर्क विभाग, मध्य रेल्वे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई यांनी जारी केले आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button