लग्न लावून नंतर पैसा व दागिने घेऊन फरार होणारी ६ महिलांची टोळी पोलिसांच्या जाळ्यात
लाखो रुपयांचे दागिने जप्त
जळगाव दि-६ में, कासोदा पोलीस स्टेशन परीसर तसेच जिल्हयात उपवर लग्नाच्या वयात असणाऱ्या गरजु व्यक्तींना हेरुन त्यांच्याशी मध्यस्तां मार्फत संपर्क करुन लग्नासाठी मुली दाखविले जातात नंतर 2 ते 5 लाख रुपये पर्यंतची रक्कम घेऊन त्यांच्याशी लग्न झालेल्या व त्यांना मुले असलेल्या मुलींशी लग्न लावुन दिले जाते. सदर मुली लग्ना नंतर काही दिवस चांगला संसार करतात व विश्वास संपादन करुन घरातुन पैसे, सोने चोरुनं पळुन जातात अशी टोळी (रॅकेट) जिल्ह्यात सक्रीय असल्याची माहिती मिळाल्याने गुप्त बातमीदारांमार्फत माहीती प्राप्त करून सदर
प्रकार उघडकीस आणून कासोदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांने दिलेल्या फिर्यादी नुसार यातील महिला आरोपी नामे 1)मोना दादाराव
शेंडे, वय-25 वर्षे 2) सरस्वती सोनु मगराज, वय-28 वर्षे दोन्ही रा. रायपुर (राज्य-छत्तीसगड), 3) अश्वीनी अरुण शेंडे,वय-25 थोरात वय-26 वर्षे रा. पांढुरना (मध्यप्रदेश) अशा तिघींचे कासोदा गावांतील तिन तरूणांसोबत आ.क्र.4) सरलाबाई अनिल पाटील, वय 60 वर्षे 5)उषाबाई गोपाल विसपुते, वय-50 वर्षे दोन्ही नादेड ता. धरणगाव जिल्हा जळगांव यांनी दि.16/04/2024 रोजी लग्न लावुन दिलेले होते. यातील एका आरोपी हीने कबुल केले की,
आम्ही तिघींचे या पुर्वी लग्न झालेले असुन आम्हांला मुले आहेत व आम्ही तिघी फसवणुकीचा प्रकार करणे
साठी घरुन महाराष्ट्रात आलेलो आहोत. फिर्यादी व त्यांचे दोन साथीदार अशांना एजंट महिला आरोपी क्रमांक-4) सरलाबाई अनिल पाटील,5)उषाबाई गोपाल विसपुते दोघे रा.नांदेड ता.धरणगांव यांनी उपवर तिन्ही मुलांच्या घरच्यांना विश्वासात घेवुन व त्यांच्याशी लग्न लावुन देण्याचे आमिष दाखवुन वेळोवेळी संपर्क करून, खोटे सांगुन लग्नासाठी उपवर तिन्ही मुलांच्या घरांच्याकडुन एकत्रीत 4,13,000/- रुपये उकळले वरील आरोपी क्रमांक 1 ते 3 यांचे यापुर्वी लग्न झालेले असुन सुध्दा त्यांनी ती माहिती लपवुन फिर्यादीची व त्यांच्या दोन साथीदारांची आर्थिक फसवणुक केली.
सदर आंतरराज्य टोळी जेरबंद करण्यासाठी मा.पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती कविता नेरकर पवार, सहा.पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख चाळीसगांव भाग चाळीसगांव यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक निलेश दिवानसिंह राजपुत, रविंद्र पाटील, राकेश खोंडे, किरण गाडीलोहार, इम्रान पठाण, नितिन पाटील, सविता पाटील अशा पथकाने कारवाई केली. जळगांव पोलीसांकडुन आवाहन करण्यात येत आहे की, अशा फसवणुक करुन विवाह लावणाऱ्या टोळ्यांच्या भुलथापांना बळी न पळता खात्री करुनच लग्ना बाबत योग्य तो निर्णय घ्यावा व अशा फसवणुक करण्याऱ्या टोळ्या सक्रिय असल्यास पोलीसांशी संपर्क करावा असे आवाहन जळगाव जिल्हा पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.