लाडक्या बहिणींसाठी दिवाळी धमाका ! दिवाळीला सरकार फक्त यांनाच देणार 5500+2500 रुपयांचा धमाकेदार बोनस
लाडकी बहीण दिवाळी बोनस | मुंबई,दिनांक -14/10/2024 दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खास गिफ्ट अर्थात दिवाळी बोनस देण्याची घोषणा केली आहे. सरकारकडून सांगण्यात आलंय की, दिवाळीला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 3000 रुपयांचा बोनस मिळणार. याशिवाय काही निवडक महिलांना अतिरिक्त 2500 रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींची दिवाळी आता मोठ्या आनंदात साजरी होणार असल्याचे संकेत मिळालेले आहेत.
दिवाळीच्या सणानिमित्त लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना 3000 रुपयांचं बोनस दिलं जाईल. ही रक्कम महिन्याला नियमित मिळणारे पैसे वगळून दिली जाईल. काही निवडक महिलांना 2500 रुपयांची अतिरिक्त रक्कमही दिली जाईल. याप्रकारे काही महिलांना एकूण 5500 (3000+2500) रुपयांचा लाभ मिळणार आहे. दिवाळीचा बोनस फक्त लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांनाच मिळणार आहे. यासाठी या खालील अटी पूर्ण कराव्या लागतील.
1) महिलेचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सूचीत असलं पाहिजे.
2) त्यांनी योजनेच्या माध्यमातून कमीत कमी तीन महिन्यांचा लाभ घेतला पाहिजे.
3) त्यांचा आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असलेलं पाहिजे.
4) ही योजना सर्व नियम आणि अटींचं पालन करत आहे.
या अटी पूर्ण केलेल्या सर्व महिलांना 3000 रुपयांचा बोनस मिळेल. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.