ॲड प्रकाश आंबेडकरांनी उभी केली तिसरी आघाडी ? आठ उमेदवारांची केली घोषणा
मुंबई, दिनांक २७ मार्च, : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सोबत होत असलेली लोकसभा निवडणुकांच्या जागा वाटपा संदर्भातील चर्चा निष्फळ ठरल्याने आणि जागा वाटपांवर समाधान खराब किडा सुटत नसल्याने आज वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या आठ उमेदवारांची घोषणा केलेली आहे. वंचित बहुजन आघाडीनं लोकसभा निवडणुकीसाठी आज महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तसेच महाविकास आघाडीसोबत न जाण्याचा निर्णय सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी घेतला आहे. ओबीसी महासंघाशी युती करुन वंचितनं मतदारांसमोर तिसरा पर्याय ठेवला आहे. त्यामुळे मागील निवडणुकीप्रमाणे यंदाही राज्यात अप्रत्यक्ष तिसरी आघाडी अस्तित्वात आलेली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी महासंघाशी युती जाहीर करत मविआवर टीका केली. यावेळी त्यांनी आठ जागांवर उमेदवारही जाहीर केले. भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिमसाठी आंबेडकरांनी उमेदवारांची घोषणा केली आहे. ओबीसी, दलित, जैन समाजाला अधिकाधिक संधी देण्याचा मानस आंबेडकरांनी बोलून दाखवला आहे.
उमेदवारांची यादी खालील प्रमाणे
भंडारा- गोंदिया: संजय गजानंद केवट
गडचिरोली-चिमूर: हितेश पांडुरंग मढवी
चंद्रपूर: राजेश वर्लुजी बेल्ले
बुलढाणा: वसंत राजाराम मगर
अकोला: प्रकाश आंबेडकर
अमरावती: प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवान
वर्धा: प्रा. राजेंद्र साळुंखे
यवतमाळ-वाशिम: खेमसिंह प्रतापराव पवार