नवी दिल्ली, दि-4 जून, सार्वत्रिक निवडणूक 2024 चे देशभरातील अनेक धक्कादायक निकाल समोर आलेले असून असाच एक धक्कादायक निकाल जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला मतदारसंघातून समोर आलेला आहे. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा गड मानला जाणाऱ्या या मतदारसंघात त्यांना दहशतवादी कारवायांप्रकरणी देशातील सर्वात मोठ्या असलेल्या दिल्लीतील तिहाड जेलमध्ये गेल्या पाच वर्षांपासून शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने जेलमध्ये राहून उमर अब्दुल्ला यांचा तब्बल 2 लाख 10 हजार मतांनी पराभव केल्याने जम्मू-काश्मीर सह देशभर मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे पूर्वाश्रमीचा दहशतवादी असलेला कैदी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत होता. त्याने प्रचाराच्या वेळी स्वतःचा प्रचार सुद्धा केला नाही. त्यामुळे मोठे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
अब्दुल रशीद शेख असे या अपक्ष उमेदवार असलेल्या कैद्याचे नाव असून त्याने तब्बल 4 लाख 70 हजार मते घेतलेली आहे. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना फक्त 261419 मते पडलेली आहे. हा देशातील सर्वात मोठा उलटफेर निकाल मानला जात आहे.