महाराष्ट्रमुंबईराजकीयराष्ट्रीय

75 व्या संविधान दिवसापूर्वी माय भारत युवा स्वयंसेवकांनी आयोजित केलेल्या ‘हमारा संविधान हमारा स्वाभिमान’ पदयात्रेत डॉ.मनसुख मांडविया सहभागी

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2024

75 व्या संविधान दिवसापूर्वी माय भारत स्वयंसेवकांनी आज नवी दिल्ली येथे  आयोजित केलेल्या 6 किमी लांबीच्या पदयात्रेत केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि श्रम आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया सहभागी झाले होते.कर्तव्यपथ आणि इंडिया गेटवरून मार्गक्रमण करणारी  “हमारा संविधान हमारा स्वाभिमान” ही पदयात्रा मेजर ध्यानचंद स्टेडियमपासून सुरू झाली होती. या  पदयात्रेत 10,000 हून अधिक माय भारत युवा स्वयंसेवक, प्रमुख युवा नेते , केंद्रीय मंत्री आणि खासदार  सहभागी झाले होते.कार्यक्रमाची सुरुवात ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमाने झाली.  याप्रसंगी  डॉ. मनसुख मांडविया यांनी आपल्या  संसदेतील  सहकाऱ्यांबरोबर वृक्षारोपण केले.यावेळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, गजेंद्र सिंह शेखावत,किरेन रिजिजू, अर्जुन राम मेघवाल, रक्षा निखिल खडसे यांच्यासह इतर खासदार पदयात्रेत सहभागी झाले होते. योगेश्वर दत्त, मीराबाई चानू, रवी दहिया, योगेश कथुनिया यांसारखे लोकप्रिय युवा ‘आयकॉन’ आणि ऑलिम्पिक पदक विजेते देखील पदयात्रेत सहभागी झाले होते.

पदयात्रेदरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. मांडविया यांनी 10,000 ‘माय भारत’ युवा स्वयंसेवकांच्या सहभागाबद्दल आनंद व्यक्त केला.देशातील तरुणांनी केवळ राज्यघटनेची उद्देशिका  वाचली नाही तर त्याबद्दलची त्यांची वचनबद्धता असल्याची  देखील पुष्टी केली, असे त्यांनी अधोरेखित केले. नव भारताचे  तरुण ‘विकसित भारत’ उभारण्याच्या दिशेने प्रगती करत आहेत, यावर त्यांनी भर दिला.सुरुवातीच्या टप्प्यावर, सर्वसमावेशक प्रदर्शनात भारतीय राज्यघटनेचा प्रवास दर्शविला गेला आणि प्रमुख व्यक्तींच्या योगदानावर प्रकाश टाकण्यात आला.

तरुणांमध्ये राज्‍यघटनेच्‍या  मूल्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या पदयात्रेत इंडिया गेट येथे एक विशेष समारंभ झाला ज्यामध्ये तरुणांनी एकत्रितपणे उद्देशिका  वाचली. या उपक्रमाने भारताच्या राज्यघटनेचा पाया म्हणून याची भूमिका आणि न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व या मूलभूत मूल्यांवर प्रकाश टाकला.

संपूर्ण कार्यक्रमात माय भारत नोंदणी मोहिमेसह युवा सहभाग हा कार्यक्रमाचा मध्यवर्ती भाग होता. ‘ राज्यघटनेची उद्देशिका ’ या संकल्पनेवर  तयार केलेल्या सेल्फी पॉइंट्वर तसेच इतर ठिकाणीही सर्वांना छायाचित्रे घेता येत आहेत.

पदयात्रेमध्‍ये दिल्‍ली राजधानी  विभागातील 125  हून अधिक महाविद्यालये आणि एनवायकेएस, एनएसएस, एनसीसी, आणि भारत स्काउट्स आणि गाईड्ससह विविध संस्थांमधील युवक सहभागी झाले.

हमारा संविधान हमारा स्वाभिमान’ पदयात्रा पाहण्यासाठी येथे ‘क्लिक’ करा  :

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button