राष्ट्रवादीच्या 8 मंत्र्यांना बंगले आणि दालनांचं वाटप, कुणाला कोणता बंगला ?
दालनांचेही झाले वाटप

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सातत्याने मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर होईल, अशी प्रतिक्रिया वारंवार देण्यात येतेय. पण अद्यापपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. विशेष म्हणजे सत्तेत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा गट सहभागी झाला आहे. त्यानंतर आता हालचाली वाढल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात काल रात्री महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर दिवसभर झालेली खलबतं यानंतर आज राष्ट्रवादीच्या नव्या 9 मंत्र्यांना शासकीय बंगले आणि कार्यालयाच वाटप करण्यात आलेलं आहे.
यांना मिळाला बंगल्याचा ताबा
मंत्री दिलीप वळसे-पाटील यांना सुवर्णगड बंगला देण्यात आला आहे.
मंत्री छगन भुजबळ यांना सिद्धगड बंगला देण्यात आला आहे.
मंत्री हसन मुश्रीफ यांना विशालगड बंगला देण्यात आला आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांना प्रचितगड बंगला देण्यात आला आहे.
मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना सुरुची-3 बंगला देण्यात आला आहे.
मंत्री अनिल पाटील यांना सुरुची-8 हा बंगला देण्यात आला आहे.
मंत्री संजय बनसोडे यांना सुरुची-18 हा बंगला देण्यात आला आहे.