पुण्यात चक्क शासकीय रूग्णालयात तब्बल दोन कोटींचे ड्रग्स जप्त, कुख्यात तस्कर रूग्ण बनून चालवत होता रॅकेट
पुणे विमानतळावर अनेकदा जप्त होते ड्रग्स
पुणे : दि 1 आँक्टोबर ,pune drugs पुणे तिथे काय उणे ही म्हण पुणेकर नेहमी सार्थकी लावत असतात, असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय चक्क पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने शासकीय ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातून अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. पुण्यात ड्रग्जचे मोठे रॅकेट चालविले जात आहे. तब्बल 134 देशांचे विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी येतात. त्यातील काही आफ्रिकन तरूणांना अमली पदार्थ पुरविण्याच्या कामातून बक्कळ पैसा मिळत असल्याने अनेक तरूण या रॅकेटमध्ये सहभागी होत आहेत. यातीलच एक म्हणजे ललित पटेल. त्याने उपचार घेण्याच्या नावाखाली ससून रुग्णालयात दाखल झाला खरा मात्र, तेथूनही तो ड्रग्जचे रॅकेट चालवत होता. मात्र, यावेळी पुणे गुन्हे विभागाच्या पोलिसांनी त्याचा हा डाव उधळून लावला. या घटनेनंतर पुण्यात एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे पुण्यात नेमकं चाललंय यरी काय? असा सवाल विचारला जातोय.ललित पटेल कडून सुमारे 1 किलो 75 ग्रॅमचे मेफिड्रोन (MD) ड्रग्ज ताब्यात घेण्यात आले आहे. MD म्हणजेच या मेफिड्रोनची किंमत बाजार भावाप्रमाणे तब्बल 2 कोटी रुपये एवढी आहे. मात्र, ससून रुग्णालय परिसरात हे ड्रग्ज आढळून आल्याने सुरक्षेसंदर्भात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत.
मेफिड्रोनप्रकरणी हाय प्रोफाईल रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून आरोपी ललित पटेल आणि आणखी 2 तरुण यात सहभागी असल्याची प्राथमिक माहिती आहे. ललित पटेल हा कुख्यात आरोपी असून ड्रग्जची तस्करी केल्याप्रकरणी त्याला या आधीच पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर,त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली होती. सध्या वैद्यकीय उपचारासाठी त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयात भरती असताना सुद्धा त्याने हे रॅकेट चालवले कसं ? याचा तपास सध्या पोलिस करत आहेत. पुण्यात मागील काही दिवसांपासून ड्रग्ज तस्करीचे मोठे जाळे तयार झाल्याचे पोलीस कारवायातून समोर आले आहे. मात्र अटकेत असलेल्या ललित पटेल नावाच्या कुख्यात ड्रग्ज तस्कराने वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली चक्क रुग्णालयातून ड्रग्ज रॅकेट चालविल्याने आता या घटनेतून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. आता पोलीस याप्रकरणी काही लोकांची चौकशी करणार आहे.