मुंबईराजकीय

मुंबईतील काही रेल्वे स्थानकांची नावे बदलणार, मात्र दादरच्या नामांतराचा प्रस्ताव अजूनही प्रलंबितच

चर्चगेट स्थानकाचे नावही बदलणार

मुंबई दि-१२ मार्च, मुंबईतील ब्रिटिशकालीन लोकल रेल्वे स्थानकांची नाव आता लवकरच बदलण्यात येणार आहेत. यात मुंबईतील ८ रेल्वे स्थानकांचा समावेश असून खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कडे या संदर्भातील प्रस्ताव पाठवलेला आहे. बुधवारी यासंदर्भातील निर्णय घेण्यात येणाऱ असल्याची माहिती खा.राहुल शेवाळे यांनी दिली आहे.
नाव बदलण्यात येणाऱ्या रेल्वे स्थानकांमध्ये अधिकतर मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या स्थानकांचा समावेश आहे. पश्चिम रेल्वेतील मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनला मुंबईचे सर्वात पहिले मालक कै. नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचे नाव देण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील करीरोड या स्टेशनचे नाव बदलून आता लालबाग करण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील सँडहर्स्ट या स्टेशनचे नाव बदलून आता डोंगरी असे करण्यात येणार आहे.
मुंबईतील प्रसिद्ध पश्चिम रेल्वेच्या मरीनलाईन्स स्टेशनचे नाव आता मुंबादेवी असे होणार आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्नीरोड या स्टेशनचे नाव बदलून आता गिरगाव करण्यात येणार आहे.
हार्बर रेल्वे मार्गावरील डॉकयार्ड या स्टेशनचं नाव बदलून माझगाव स्टेशन करण्यात येणार आहे.
कॉटनग्रीन रेल्वे स्थानकाचं नाव काळाचौकी स्टेशन करण्यात येणार आहे.
किंग्स सर्कल रेल्वे स्थानकाचं नाव बदलून तीर्थकर पार्श्वनाथ असे करण्यात येणार आहे.
दादर स्थानकाचे नामांतर कधी ?
मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांचे नावे बदलत असताना  मात्र गेल्या अनेक वर्षांपासून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव महानिर्वाण झालेल्या चैत्यभूमीला अर्थात दादर रेल्वे स्थानकाला देण्याची मागणी अजूनही प्रलंबित आहे. अर्थात दादर रेल्वे स्थानकाचे चैत्यभूमी असे नामकरण करण्यासंदर्भातल्या प्रलंबित प्रस्तावाकडे सरकारचं लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दादरच्या नामांतराचा सर्वात जुना प्रश्न कधी सुटणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मध्यंतरी चर्चगेट स्थानकाचे नाव बदलून चिंतामणराव देशमुख अर्थात सीडी देशमुख असे होणार असल्याचे सरकारने जाहीर केले होते,मात्र ते सुद्धा अजून प्रलंबित आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button