महाराष्ट्रमुंबईराजकीय
पंकजा मुंडेंचा राजकीय वनवास संपला की नाही ? लोकसभा उमेदवारीच्या यादीत आहे का नाव ?
मुंबई दि-१३, भाजपने लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून २० उमेदवारांची यादी जाहीर केलेली असून यात बीडमधून विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांना डच्चू देऊन त्यांच्या भगिनी पंकजा गोपीनाथ मुंडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून पंकजा मुंडे ह्या त्यांच्या विधानामुळे चर्चेत होत्या त्यांनी असं म्हटलं होतं की मी गेल्या पाच वर्षांपासून राजकीय वनवासात असून पक्षाने माझा विचार करावा.
आता त्यांना भाजपकडून बीडची लोकसभेची उमेदवारी मिळाल्यामुळे त्यांचा राजकीय वनवास संपल्यासारखे आहे.