दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आले गोत्यात, यांच्या बाबतीत हे नेमकं काय घडलंय, समर्थक कार्यकर्ते रस्त्यावर
दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या आखाडा तापण्याआधीच दिल्लीच्या राजकारणाला हादरावून सोडणारी बातमी समोर आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अखेर ईडीने अटक केली आहे. दोन तासांच्या चौकशीनंतर ईडीने केजरीवालांना अटक केली आहे. आतापर्यंत त्यांना 10 समन्स बजावले होते, पण त्यांनी त्याला उत्तरं दिली नाही. अखेरीस अटक करण्यात आली आहे. आज दुपारी दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता.
दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने अरविंद केजरीवाल यांना आज दहावा समन्स बजावला होता. ईडीचे सहा ते सात अधिकारी केजरीवाल यांच्या घरी पोहोचले होते. त्यांनी केजरीवाल यांना समन्स जारी केलं होतं. आतापर्यंत दारू घोटाळ्याप्रकारांनी ईडी कडून 8 समन्स देण्यात आले होते. पण केजरीवाल यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. अखेरीस ईडीने केजरीवालांना अटक केली आहे. दरम्यान, केजरीवाल यांना अटक होऊ नये म्हणून तातडीने आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आहे. अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात येवू नये अशी मागणी याचिकेत सुप्रीम कोर्टात करण्यात येणार आहे. या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्यात यावी यासाठी आपकडून प्रयत्न सुरू आहे.
अरविंद केजरीवालांवर आरोप
गुन्ह्याच्या प्रक्रियेदरम्यान आम आदमी पार्टीला 338 कोटी रुपये पोहोचल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे.वास्तविक, मनीष सिसोदिया यांच्या जामिनावर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान अंमलबजावणी संचालनालयाने न्यायालयासमोर ३३८ कोटी रुपयांचा मनी ट्रेल ठेवला होता, ज्यामध्ये हे सिद्ध झाले होते की उत्पादन शुल्क धोरणादरम्यान ३३८ कोटी रुपये होते. दारू माफियांतून आम आदमी पक्षापर्यंत पोहोचले. अरविंद केजरीवाल हे पक्षाचे मुख्य नेते आहेत, त्यामुळे त्यांची चौकशी करणे आवश्यक आहे.