जळगावमहाराष्ट्रमुंबईराजकीय

DCM देवेंद्र फडणवीस व आ.संजय सावकारेंची सकारात्मक बैठक, भुसावळातील 5 महत्त्वाचे व गुंतागुंतीचे प्रश्न मार्गी लावले

अमृत योजना,दिपनगरचे प्रश्न लागले मार्गी


 
मुंबई, दि. ०८/०८/२०२४:- अमृत योजनेतून भुसावळ शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या तांत्रिक बाबी तपासल्या जाव्यात.  या योजनेतून पाणी पुरवठा लवकर सुरू होण्यासाठी योजनेच्या कामांना तात्काळ गती देण्यात यावी, अशा सक्त सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलेल्या आहेत.
      उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने सकारात्मक बैठक पार पडलेली आहे. बैठकीस आमदार संजय सावकारे, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यांच्यासह संबधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीस जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.


  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,अमृत पाणी पुरवठा योजनेची कामे वेगाने पूर्ण होणे महत्वाचे आहे.  यासाठी संबधित यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार तात्काळ कार्यवाही सुरू करावी. भुसावळ शहराला पाणी पुरवठा योजनेसंदर्भात जिल्हाधिकारी जळगाव यांनी बैठकीचे आयोजन करून याबाबतची तातडीने आढावा बैठक घेण्यात यावी.
वरणगाव शहराचा प्रश्नही चर्चेत
या बैठकीत वरणगाव शहरातील पाणी पुरवठा योजनेबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. याबाबत असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी संबधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आलेल्या आहेत.
        जळगाव महानगरपालिका व वरणगाव नगरपंचायत क्षेत्रातील सांडपाण्यावरील प्रक्रिया प्रकल्पाबाबत दिपनगर येथील महाजनको कंपनी समवेत तातडीने सामंजस्य करार करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलेल्या आहेत.
दिपनगर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न लागणार मार्गी
भुसावळ तालुक्यातील दिपनगर येथील विद्युत निर्मिती केंद्रातील प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबतही यावेळी सकारात्मक चर्चा झालेली असून त्यांचे प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून शासन दरबारी प्रलंबित असलेले वरील सर्व प्रश्न आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी सकारात्मक चर्चेद्वारे सोडवून आणलेले आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button