मुंबई दिनांक 24 मार्च, भारतीय जनता पक्षाने आज लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केलेली आहे. तब्बल लक्षात 111 उमेदवारांच्या या यादीत भाजपने अनेक मातब्बर नेत्यांचा पत्ता कट केलेला आहे आहे. यामध्ये उत्तम प्रदेशातील पिलीभीतमधून युवा दिग्गज नेते वरुण गांधी यांचा पत्ता कापला असून काँग्रेस मधून आयात केलेले जितिन प्रसाद यांना तिकीट दिलेले आहे. गेल्या वर्षी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर उघडपणे खणखणीत टीका करताना, वरुण गांधी यांनी लोकांना. ” साधूला कामात व्यत्यय आणू नका” असा अफलातून सल्ला दिला होता. कारण ते “साधू महाराजजी मुख्यमंत्री कधी होतील ” हे कोणालाही माहिती नाही. असे उलटसुलट वक्तव्य वरुण गांधी यांनी केले होते.
सप्टेंबर 2023 मध्ये, त्यांनी एका रुग्णाच्या मृत्यूनंतर अमेठीच्या संजय गांधी रुग्णालयाचा परवाना निलंबित केल्याबद्दल उत्तर प्रदेश भाजप सरकारवर हल्लाबोल केला होता.
2021 मध्ये, वरुण गांधी यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढून टाकण्यात आले , त्यांनी लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणात जबाबदारी निश्चित करणे आणि दोषींना न्याय देण्याचे आवाहन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केले होते.
या वर्षाच्या सुरुवातीस, काही महिन्यांपूर्वी उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिरात वरुण गांधी यांनी त्यांचा दूर गेलेला चुलत भाऊ आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर ते काँग्रेसमध्ये सामील होऊ शकतात अशा बातम्या आल्या होत्या.