क्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्रमुंबईराजकीय

निवडणुकीच्या प्रचारात बालकांचा बेकायदेशीरपणे वापर करून सुद्धा संबंधितांवर कारवाईसाठी दुर्लक्ष

उमेदवारांसह आयोजकांवर कारवाईची टांगती तलवार

जळगाव – दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील पवार आणि रावेर लोकसभा मतदारसंघासाठी चे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानापासून निघालेल्या तीन तासांच्या रखरखत्या कडाक्याच्या उन्हातील तीन तासांच्या रॅलीत काही अल्पवयीन बालकांचा राजकीय हेतू साध्य करण्याच्या उद्देशाने प्रचारासाठी वापर करण्यात आल्याचे दृश्य व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. यासंबंधीचे वृत्त “मीडियामेल न्यूजने” Media mail news या youtube चॅनलवर प्रकाशित केलेले होते.या वृत्तातील दृश्यांमध्ये अल्पवयीन बालकांचा निवडणूक प्रचारासाठी वापर करताना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे उघडपणे उल्लंघन होताना दिसत आहे. केंद्रिय निवडणूक आयोगाने निवडणूकीच्या कोणत्याही प्रचार आणि तत्सम क्रियाकलापांमध्ये बालकांचा वापर करून घेण्यास पूर्णतः प्रतिबंध घातलेला आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या प्रतिबंधक कायद्याच्या नियमांना सुद्धा याठिकाणी हरताळ फासल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आचारसंहिता मार्गदर्शक तत्वानुसार अल्पवयीन बालकांना निवडणुकीच्या विविध प्रकारच्या आणि प्रचाराच्या क्रियाकलापांंमध्ये राजकीय हेतू साध्य करण्यासाठी सहभागी करून घेण्यास पूर्णतः बंदी घातलेली आहे. निवडणुकीच्या क्रियाकलपांमध्ये बालकांचा वापर करणार नाही यासंबंधीचे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाने सर्वच नोंदणीकृत राजकीय पक्षांकडून घेतलेलं आहे. असे असताना जळगाव शहरातील त्या मिरवणुकीमध्ये निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांची व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी झालेली दिसत नाही. तसेच या रॅलीच्या व्हिडिओमध्ये नियमांचे बिनधास्तपणे उल्लंघन झालेले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिला दुजोरा
मिडिया मेल न्यूजनेच फक्त या गंभीर विषयासंबंधीच्या वृत्ताचा व्हिडिओ “मिडिया मेल न्यूज” या युट्यूब चॅनलवर प्रकाशित केलेला होता. या संबंधित वृत्ताचा व्हिडिओ लक्षपूर्वक बघितल्यानंतर मा.जिल्हाधिकारी जळगाव यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या “मार्गदर्शक तत्वांचे” आणि नियमांचे याठिकाणी उल्लंघन झाल्याच्या बाबीला प्रथमदर्शनी दुजोरा दिलेला आहे. तसेच उपविभागीय अधिकारी जळगाव यांना संबंधित व्हिडिओची पडताळणी करून तात्काळ संबंधित सर्व व्यक्तींना संबंधित व्हिडिओची खात्री करून नोटीस बजावण्याची सूचना देखील केलेली आहे.


राजकीय हेतू साध्य करण्यासाठी बेकायदेशीरपणे बालकांचा प्रचारासाठी वापर करण्यात आल्याने या गंभीर प्रकरणावर संबंधित अधिकारी यांनी तात्काळ लक्ष देणं गरजेचं आहे. तसेच या रॅलीची स्वतः निवडणूक अधिकारी, निरीक्षक आणि त्यांच्या संबंधित कर्मचाऱ्यांनी त्याच दिवशी संबंधित रॅलीची शूटिंग केलेली आहे. तो डाटा त्यांच्याकडे उपलब्ध आहे. असे असताना अनेक दिवस होऊन सुद्धा यावर कारवाई होण्यास विलंब झाल्याने लोकशाही प्रेमींनी आणि बालकामगार विरोधी काम करणाऱ्या व्यक्तींनी नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी, तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या आचारसंहिता मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या रॅलीशी संबंधित उमेदवार, मिरवणूकीचे आयोजक आणि संबंधित ट्रॅक्टर मालक यांच्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आचारसंहिता मार्गदर्शक तत्त्वानुसार, बालहक्क संरक्षण आयोगाच्या निर्देशानुसार आणि बाल कामगार प्रतिबंधक कायद्यान्वये नोटीस बजावून योग्य ती कायदेशीर कारवाई होण्याची गरज असताना संबंधित उपविभागीय अधिकारी जळगाव हे कामाच्या व्यापामुळे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मतदानाची तारीख जवळ येत असताना आता संबंधित अधिकारी या गंभीर विषयासंबंधी काय भूमिका घेतात याकडे जळगाव जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button