क्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्रमुंबई
सावदा-भुसावळ रस्त्यावर भीषण अपघातात तीन ठार, चारचाकीचा चक्काचूर
जळगाव दि-20/12/2024, जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील सावदा-भुसावळ रस्त्यावर पिंपरूड गावाजवळ रात्री दोन वाजेच्या सुमारास भुसावळ कडून येणाऱ्या एम एच 20 सीएच 8002 या क्रमांकाच्या होंडा सिटी चारचाकी गाडीने रस्त्यावर असलेल्या एका लिंबाच्या झाडाला जोरदार धडक दिल्याने त्यात कारचा चक्काचूर झाला असून 3 जण जागीच ठार झाले आहेत.
दरम्यान, कारमधील मयत झालेले तीन तरूण भुसावळ येथील मित्राच्या बहिणीच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून रावेर कडे परतत असताना हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. यातील अन्य दोन जण गंभीर जखमी असून त्यांना सावदा येथील खाजगी रूग्णालयात भरती करण्यात आलेलं आहे.