मुंबई दि:26 ”भुसावळ शहरात आजही तब्बल ६५ वर्षांपूर्वीच्या पाईपलाईन असून यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे. याचे निराकरण करण्यासाठी जळगाव आणि भुसावळ शहरातील अमृत योजनेची संयुक्त बैठक होईल असे मुख्यमंत्र्यांच्या वतीने गेल्या अधिवेशनात सांगण्यात आले होते. मात्र अद्यापही ही बैठक झालेली नाही. यामुळे ही बैठक होणार तरी कधी ? असा संतप्त सवाल आज भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी विधानसभेत उपस्थित केला.
दोन लाख लोकसंख्येच्या भुसावळ शहरातील नागरिकांच्या पाण्याचा हा गहन प्रश्न आहे. त्यामुळे यावर आता बैठक घेण्यासाठी संबंधितांना तात्काळ कळवावे, जेणेकरून भुसावळकरांच्या पाण्यासारखा जिव्हाळ्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, अशी मागणी भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी विधानसभेत केलेली आहे.