केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जळगावातून Live , राष्ट्रीय युवा संमेलन जळगाव
अमित शाहांच्या घोषणेकडे उत्तर महाराष्ट्राचे लक्ष लागून
जळगाव,दि-5 मार्च, भाजपचे महाशक्ती म्हणून ओळखले जाणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज जळगाव दौऱ्यावर असून त्यांचे नुकतेच जळगाव विमानतळावर स्वागत करण्यात आले. ते आता सागर पार्क मैदानावर राष्ट्रीय युवा संमेलनात युवकांना संबोधित करत आहेत.
याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन ,मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार , भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहे. नाशिक पोलीस परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी, महापालिका आयुक्त श्रीमती गायकवाड यांनीही स्वागत केले.तसेच आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण यांचेसह जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी उपस्थित आहेत.
या युवा संमेलनाला पोलीस प्रशासनातर्फे विशेष सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आलेली असून प्रचंड मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. लाखोंच्या संख्येने युवा या संमेलनात उपस्थित असल्याचे चित्र दिसून येत आहे.अमित शाह काय बोलतात याकडे उत्तर महाराष्ट्राचे लक्ष्य लागून आहे.
Live सभा बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा