महाराष्ट्रमुंबईराजकीयराष्ट्रीय

गुजरातमध्ये मोदी-शहांना मोठा झटका, दोन विद्यमान खासदारांनी भाजपचे तिकीट नाकारल्याने खळबळ

उमेदवार बदलाची मोदी-शाहांवर वेळ

भाजपने लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर उत्तर प्रदेशातील काही विद्यमान खासदारांनी तिकीट नाकारले होते. तसेच निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नसल्याचे जाहीर केले होते.तोच धक्कादायक प्रकार आता भाजपचे जेष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या होम ग्राऊंडवर घडलेला आहे. यात घडलं असयं की, वडोदरा लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार रंजनबेन भट्ट यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार दिलेला असून तसे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. वडोदरा लोकसभा जागेसाठी तिसऱ्यांदा रंजनबेन भट्ट यांच्या नावाची घोषणा झाली. त्यांच्या नावाला भाजप नेत्या ज्योतिबेन पंड्या यांनी विरोध केला. भाजपच्या राष्ट्रीय महिला विंगच्या उपाध्यक्षा ज्योतिबेन पंड्या यांनी पक्षाचा आणि सर्व पदांचा राजीनामा दिला होता. तसेच, रंजनबेन भट्ट यांच्या नावाचा निषेध करणारे बॅनरही शहरातील विविध भागात लावण्यात आले होते.वैयक्तिक कारणांमुळे 2024 ची लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही असे त्यांनी म्हटलेलं आहे.तसेच रंजनबेन यांनी जर पदाधिकारी यांचा विरोधच असेल तर निवडणूक लढवण्याला काही अर्थ नाही असा जाहीर वक्तव्य केला आहे.
2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी आणि वडोदरा अशा दोन ठिकाणाहून निवडणूक लढविली होती. दोन्ही मतदार संघातून ते विजयी झाले होते. मात्र, त्यांनी वडोदराची जागा सोडली. त्यामुळे येथे झालेल्या पोटनिवडणूक झाली. यात भाजपच्या भट्ट यांनी विजय मिळविला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला होता. आता 2024 च्या निवडणुकीतही त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली होती.
भिकाजी ठाकोर यांचीही माघार
भाजपचे आणखी एक घोषित उमेदवार भिखाजी ठाकोर यांनीही निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली. त्यांनी यासाठी वैयक्तिक कारण पुढे केले आहे. ‘इन्स्टाग्राम’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपण निवडणूक लढवू इच्छित नसल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यांनी लिहिले, मी, भिकाजी ठाकोर, वैयक्तिक कारणांमुळे 2024 ची लोकसभा निवडणूक साबरकांठामधून लढण्यास इच्छुक नाही.
अशाप्रकारे गुजरात मधून आतापर्यंत दोन विद्यमान खासदारांनी लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुद्धा तिकीट नाकारल्याच्या घटना घडलेल्या आहे. आता हे लोण महाराष्ट्रात येते की काय अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button