महाराष्ट्रराजकीय

जळगाव महसूल अधिकाऱ्यांना जिल्हा नियोजनमधून नवीन चारचाकी वाहने उपलब्ध

जळगाव, दि.२१ ऑगस्ट जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून जिल्हा महसूल प्रशासनाला आज चार नवीन वाहने पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री ना.गिरीष महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांच्या हस्ते हस्तांतरित करण्यात आल्या. यावेळी आमदार किशोर पाटील, आमदार मंगेश चव्हाण ,जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थ‍ित होते.

जिल्हा नियोजन समितीच्या मध्यमातून प्रत्येकी ८ लाख रूपये किंमत असलेले चार नवीन महेंद्रा बोलेरा वाहने खरेदी करण्यात आली होती. जळगाव उपविभागीय अधिकारी, तहसीलदार एरंडोल, चाळीसगाव व रावेर यांना महसूली कार्यालयांना वाहने हस्तांतरित करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड,जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, तहसीलदार विजय बनसोडे, संबंधित प्रांतधिकारी व तहसीलदार उपस्थ‍ित होते.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button