जळगाव दि-29 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगांव महानगरच्या वतीने दिनांक २८/९/२०२३ गुरुवार रोजी मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या संर्व गणेश मंडळांना गणराया पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगांव महानगर वतीने वर्ष २०२३ गणराया पुरस्कार श्री आप्पासाहेब गुलाबरावजी देवकर (माजी कृषि , परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य ) राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड. भैय्यासाहेब रविन्द्रजी पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या उपस्थितीत गणेश मंडळांना पुरस्कार देण्यात आले आहे.
जळगाव शहरातील मिरवणूकीत सहभागी झालेल्या विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी यांच्या तर्फे विविध प्रकारचे लेझीम, ढोलताशे,आखाडे आणि विविध प्रकारचे देखावे सादर करण्यात आले होते.
यावेळी मानाचा असलेल्या जळगांव महानगर पालिकेच्या गणपती मंडळाचे अध्यक्ष व आयुक्त डॉ विद्या गायकवाड व उपाआयुक्त गणेश चाटे यांचा स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर मुख्य मिरणूकीत सहभागी झालेल्या सर्व गणेश मंडळांना त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते अशा मिळून एकूण ६५ गणेश मंडळांना पुष्पगुच्छ व स्मृति चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्क्रीन लावण्यात आली होती.
या कार्यक्रमाचे सुत्र संचालन आदिवासी विकास जिल्हाध्यक्ष इब्राहिम तडवी व सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अशोक सोनवणे , महानगर जिल्हा उपाध्यक्ष डॉ संग्राम सिंग सुर्यवशी यांनी केले.
यावेळी सौ मंगलाताई पाटील , उमेश पाटील , रमेश पाटील , रिंकु चौधरी , किरण राजपूत , राजु मोरे , सुनिल भैय्या माळी , डॉ उदासी , अमोल कोल्हे , प्रमोद पाटील , अकिल पटेल , रमेश बारे , अकिल खान , बंशीर शाह , मतिन सैय्यद , खलिल शेख , हितेश जावळे , चेतन पवार , सुहास चौधरी , आकाश हिवाळे , सौ शालणीताई , सौ ममता सोनवणे , सौ वर्षा राजपूत ,सौ पूनम खैरनार , हारशाली पाटील ,नंईम खाटीक , राहुल टोके , योगेश साळी , योगेश लाडवंजारी , राजु बाविस्कर , संतोष चाटे , उमेश वाघ , योगेश घुगे , समाधान देशमुख ,जगन्नाथ पाटील इतर राष्ट्रवादीचे काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.