पुणे-नगर महामार्गावर दोन बस जोरदार धडकल्या, काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढले
पुणे दि:31- राज्यातील अपघातांचे सत्र काही केल्या थांबत नसून आज सकाळी पुन्हा एकदा पुणे-नगर महामार्गावर पीएमपीएमएलच्या दोन बसेसची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात 15 प्रवासी किरकोळ तर 13 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र दोन्ही बसेसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे.
समृद्धी महामार्गावर दुसरा मोठा अपघात,गर्डर बसवताना क्रेन कोसळून 17 ठार
पुणे – नगर महामार्गावर असणाऱ्या बीआरटी मार्गावर दोन पीएमपीएमएल इलेक्ट्रिक बसची समोरासमोर जोरात धडक झाल्याची घटना घडली आहे. या धडकेत बसमधील अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. यात चालकाला गंभीर दुखापत झाली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली आगारातील कात्रज ते वाघोली बस वाघोलीच्या दिशेने येत असताना नतावाडी आगारातील बस तळेगाव ढमढेरे ते मनपा या पुण्याकडे जाणाऱ्या बस एकमेकांवर बीआरटी थांबाच्या परिसरात समोरासमोर सकाळी 8.45 वाजेच्या सुमारास दोन्ही बस एकमेकींना समोरासमोर जोरात धडकल्या.
मुंबईत धावत्या एक्सप्रेसमध्ये अंदाधुंद गोळीबाराने खळबळ,एका पोलिस अधिकाऱ्यासह चार ठार
या अपघातात बसचा वेग अधिक असल्याने इलेक्ट्रिक बसचा पुढील भाग समोरील बस मध्ये घुसल्यामुळे अनेक प्रवाशांना गाडीच्या काचा फोडून बाहेर काढावे लागले असून त्यात अनेक प्रवाशी देखील जखमी झाले आहेत.
तसेच या अपघातात इलेक्ट्रिक बसचा वाहन चालक गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी स्थानिक नागरिकांकांच्या मदतीने प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले आहे. जखमींना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अपघात नेमका कोणत्या कारणाने घडला हे अद्याप समजू शकलेले नाही.
बस चालक अती वेगात वाहन चालवत असल्याची माहिती समोर आली असून यामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागत आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पीएमपीएल प्रशासनाचे अधिकारी व महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र सार्वजनिक वाहतूक करणारे चालक वेगात वाहने चालवत असतील तर प्रशासन त्यांच्यावर कारवाई करणार का असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. घटनास्थळावरून दोन्ही बस हटवण्यात आल्या असून वाहतूक पोलिसांच्या मदतीने सुरळीत करण्यात आली आहे.