क्राईम/कोर्टमहाराष्ट्रमुंबईराजकीय

भाजपचे तीन आमदार कायद्याच्या कचाट्यात अडकले, नेमकं काय आहे हे प्रकरण ?

मीरारोडमध्ये चिथावणीखोर भाषणं प्रकरण

मुंबई दि-२१, जानेवारी 2024 मध्ये उफाळलेल्या मुंबई लगतच्या मीरा रोड भागातील हिंसाचारानंतर त्या भागात जाऊन कथित चिथावणीखोर आणि द्वेषपूर्ण भाषणे केल्याबद्दल महाराष्ट्रातील भाजपचे आमदार नितेश राणे आणि मीरारोडच्या आमदार गीता जैन आणि तेलंगणाचे आमदार टी राजा सिंह यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंदवण्याची मागणी करणारी याचिका गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली.
हिंसाचारातील दोन पीडितांसह मुंबईतील पाच रहिवासी असलेल्या याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात सांगितले की, तीन नेत्यांविरुद्ध पोलिसांनी प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदविला नसल्याने त्यांना न्यायालयात नाईलाजाने जाण्यास भाग पडले आहे.
याचिकेत ठळकपणे नमूद केले आहे की, 21 जानेवारी 2024 रोजी मीरा रोड येथील अल्पसंख्याक वस्तीत हिंसाचार उसळला होता जो संपूर्ण शहरात पसरला होता.
हे चालू असतानाच, आमदार नितेश राणे यांनी आमदार गीता जैन यांच्यासोबत मीरा रोडच्या काही भागांना भेट दिली आणि त्यांच्या भाषणातून अल्पसंख्याक समाजाला खुलेआम धमकावले गेले होते.
टी राजा यांनी 25 फेब्रुवारी रोजी त्यांच्या मीरा रोड रॅलीमध्ये काही जातीय टिप्पणी देखील केली होती, असा दावा याचिकाकर्त्यांनी केलेला आहे.
नितेश राणेंनी गोवंडी आणि मालवणीसारख्या उपनगरांना भेटी देऊन अधिक द्वेषपूर्ण भाषणे दिल्याचेही याचिकेत अधोरेखित करण्यात आले आहे.
स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे जाऊन आमदारांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची विनंती केली. मात्र, कोणतीही कारवाई झाली नाही, असे याचिकेत म्हटलेलं आहे.
याचिकाकर्त्यांनी म्हटलेलं आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून अशा द्वेषपूर्ण भाषणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची स्वतःहून कारवाई करण्यात मुंबई पोलीस अपयशी ठरले आहेत.

भाषण करणाऱ्याचा किंवा असे कृत्य करणाऱ्या व्यक्तीच्या धर्माचा विचार न करता अशी कारवाई केली पाहिजे, जेणेकरून भारताचे धर्मनिरपेक्ष चारित्र्य जपले जाईल आणि संरक्षित होईल,” असे याचिकेत  ठळकपणे नमूद करण्यात आले आहे.याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की, त्या मीरारोड भागातील पोलीस एफआयआर नोंदविण्यात अपयशी ठरले असूनही त्याबद्दल अनेक प्रसारमाध्यमांनी वृत्त देखील दिले होते.
त्यामुळे नितेश राणे, गीता जैन आणि टी राजा यांच्याविरुद्ध कलम १५३ (दंगल घडवण्याच्या उद्देशाने चिथावणी देणे), कलम १५३अ, १५३बी (गटांमधील वैमनस्य वाढवणे), २९५अ (पूजेचे ठिकाण अपवित्र करणे) अन्वये गुन्हा नोंदविण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. ), 504 आणि 505 (सार्वजनिक शांतता भंग करणारी विधाने, अनैतिकता व अराजकता निर्माण करणारी विधाने ) अशा कलमांखाली गुन्हे दाखल करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
या याचिकेवर २७ मार्च रोजी महत्त्वपूर्ण सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button