क्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्र

भुसावळ येथील मनोज बियाणींसह परिवाराला ‘एवढ्या’ लाखांचा दंड, अप्पर जिल्हाधिकारी यांचा आदेश

भुसावळ दि-18/09/2024 भुसावळ तालुक्यातील मिरगव्हाण शिवारातील गट नं. 96/1, 96/2, 96/3 येथील मिळकतीचा भूभाग रहिवासी प्रयोजनार्थ बिनशेती आदेश असतांना बियाणी पब्लिक स्कुलचे संचालक मंडळ कांताबाई बन्सीलाल बियाणी, मनोज बन्सीलाल बियाणी, विनोद बन्सीलाल बियाणी, ममता श्रीकांत कलंत्री यांच्याकडून वाणिज्य वापर होत असल्याची तक्रार सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे केलेली होती.
या प्रकरणी भुसावळ येथील प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी सदर तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून त्यानुसार बियाणी परिवाराला 1 लाख 39 हजार 13 रूपये दंडाचे आदेश 20/10/2023 रोजी दिलेले होते.
दरम्यान,सदर प्रकरणात उपविभागीय अधिकारी भुसावळ यांनी कागदपत्रे व कायद्यातील तरतुदी तपासून स्थळ निरीक्षण करून अपिलार्थी व उत्तरार्थी यांना सुनावणीची संधी देऊन कायदेशीर व उचित आदेश पारित करणे अपेक्षित असताना उपविभागीय अधिकारी भुसावळ यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे योग्य ती फेरचौकशी केलेली नव्हती. म्हणून त्या आदेशाविरूध्द माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी अप्पर जिल्हाधिकारी जळगाव यांच्या न्यायालयात आरटीएस/अपिल क्र.182/2023 दाखल केले होते. त्या अपिलाचा निकाल अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी दिनांक -13/09/2024 रोजी दिलेला आहे. त्या आदेशामध्ये अपिलार्थी यांचे अपिल मंजुर करण्यात येत आहे व उपविभागीय अधिकारी भुसावळ भाग भुसावळ यांच्याकडील क्र./जमीन/एसआर/206/2023 मधील दिनांक-20/10/2023 रोजीच्या आदेशात अंशतः सुधारणा करण्यात येवून निष्कर्षात नमुद केल्याप्रकरणी शास्तीची रक्कम 3 लाख 14 हजार 213 मात्र करण्यात येते, असे सुधारीत आदेश देण्यात आलेले आहे. बियाणी परिवारातर्फे अ‍ॅड.कल्याण पाटील व अ‍ॅड.संदीप ठाकरे यांनी तर सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी स्वतः आपली बाजू मांडली होती.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button