Advertisement
जळगावनिवडणूकमहाराष्ट्रराजकीय

भुसावळ: वार्ड क्र.11 ‘अ’ चे अपक्ष उमेदवार निळकंठ रामदास भारंबे यांना मतदारांचा तुफान प्रतिसाद,विजयाचा व्यक्त केला विश्वास

माजी नगराध्यक्षांच्या अपक्ष उमेदवारीने इतर उमेदवारांपुढे उभे केले तगडे आव्हान

भुसावळ – मतदानाची तारिख जसजशी जवळ येतेयं तशी तशी नगरपरिषदेची निवडणूक आता रंगतदार वळणावर आलेली असून प्रभाग क्रमांक 11 ‘अ’ मधून नगरसेवक पदासाठी माजी नगराध्यक्ष राहिलेले निळकंठ रामदास भारंबे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला असून त्यांची निशाणी घेऊन ते मतदारांपुढे आर्शिवाद घ्यायला जात आहे. त्यामुळे इतर सर्व उमेदवारांपुढे मोठे तगडे आव्हान उभे राहिले आहे. प्रभाग क्रमांक 11 मधील बहुसंख्य महिला व पुरुष उमेदवारांनी त्यांच्या सोबत प्रचार मिरवणुकीत स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला आहे. ते यापूर्वी नगराध्यक्ष असताना यांच्या संकल्पनेतून संपूर्ण भुसावळ शहरात कोट्यवधी रुपयांची विकासकामे पूर्ण करण्यात आलेली होती. तसेच ते एक संयमी, सुसंस्कृत , विश्वासदर्शक आणि उच्चशिक्षित राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. दररोज आपल्या प्रभागात ते मतदारांपुढे आर्शिवाद घ्यायला जात असून आपल्या विजयाचा ठाम विश्वास उमेदवार निळकंठ रामदास भारंबे यांनी व्यक्त केला आहे.


दरम्यान ,याप्रसंगी प्रभागातील प्रतिष्ठित शेकडो नागरिक, महिला व पुरुषांसह शेकडो मतदारांचा मोठा जनसमुदाय प्रचार मिरवणुकीत स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे या प्रभागातील मतदारांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झालेले आहे.
तसेच निळकंठ रामदास भारंबे यांचे घरोघरी महिलांनी औक्षण करून जोरदार स्वागत केलेले आहे.

यावेळी त्यांनी मतदारांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत. तसेच सर्व प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी आणि प्रभागाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहणार असल्याचे ठोस आश्वासन दिलेले आहे. प्रभागातील प्रत्येक गल्लीत मतदारांकडून निळकंठ रामदास भारंबे यांना उदंड प्रतिसाद मिळालेला दिसून येत आहे. यामुळेच त्यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Back to top button