Advertisement
जळगावनिवडणूकराजकीय

भुसावळ: सौ.शारदा दिपक धांडे यांनी वार्ड क्र.8 ‘ब’ मधून विजयाचा व्यक्त केला ठाम विश्वास

मार्गाचा सर्वांगिण विकास करण्याची ग्वाही

भुसावळ – नगरपरिषदेची निवडणूक आता रंगतदार वळणावर आलेली असून प्रभाग क्रमांक ८ ‘ब’ मधून नगरसेवक पदासाठी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार शिवसैनिक सौ. शारदा दिपक धांडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला असून, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भुसावळचे आमदार तथा वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या नेतृत्वाखाली आणि आशिर्वादाने महायुतीच्या माध्यमातून मतदारांपुढे त्यांच्या सेवेसाठी आर्शिवाद घ्यायला जात आहे. प्रभाग क्रमांक ८ मधील बहुसंख्य महिला व पुरुष उमेदवारांनी त्यांच्या सोबत प्रचार मिरवणुकीत स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला आहे.
दरम्यान, समाज नगरसेवक तथा शिवसैनिक दिपक धांडे यांनी गेल्या काही वर्षांपासून प्रभागातील नागरिकांच्या विविध प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी अहोरात्र केलेल्या जनसेवेच्या प्रयत्नांच्या जोरावर मतदारांपुढे आर्शिवाद घ्यायला जात असून आपल्या विजयाचा ठाम विश्वास शारदा दिपक धांडे यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान ,याप्रसंगी प्रभागातील प्रतिष्ठित शेकडो नागरिक, महिला व पुरुषांसह शेकडो मतदारांचा मोठा जनसमुदाय प्रचार मिरवणुकीत स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहे. शिवसैनिक शारदा दिपक धांडे यांच्या उमेदवारीमुळे या प्रभागातील मतदारांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झालेले आहे.
तसेच उमेदवार शारदा दिपक धांडे यांचे घरोघरी महिलांनी औक्षण करून जोरदार स्वागत केलेले आहे. यावेळी उमेदवार शारदा दिपक धांडे यांनी मतदारांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत. तसेच सर्व प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले आहे. प्रभागातील प्रत्येक गल्लीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. रजनी संजय सावकारे यांनाही एक मत देण्यासाठी आवाहन करण्यात आलेले असून, मतदारांकडून याला उदंड प्रतिसाद मिळालेला दिसून येत आहे.

अधिक पुढील बातमी वाचा

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, विधी व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -9820203031

Related Articles

Check Also
Close
Back to top button
Join WhatsApp