Advertisement
क्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्र

भुसावळ शहरातील मुख्य बाजारपेठेतील शिवम इलेक्ट्रीकल्समध्ये धाडसी चोरी,लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज

भुसावळ, दि-०२/११/२५, भुसावळ शहरातील मुख्य बाजारपेठेतील शिवम इलेक्ट्रीकल्स या दुकानात पहाटे दुकानाचे शटर वाकवून झालेल्या धाडसी चोरीमुळे शहरातील व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडालेली आहे. या चोरीमुळे दुकान मालक राजेश बलराम तलरेजा यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. याबाबत झालेल्या नुकसानीचा अंदाज बांधला जात असून, सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. यामुळे पुन्हा एकदा पोलिस प्रशासनाच्या अकार्यक्षमतेबाबत आणि निष्क्रियतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे.


     दरम्यान, दोन दिवसांपूर्वी राज्याचे अप्पर पोलिस महासंचालक नवल बजाज हे बाजारपेठ पोलीस ठाण्याची तपासणी आणि परिक्षण करुन गेले होते. त्याच दिवशी शहरातील काही युवकांनी त्यांच्या गाडीसमोर छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलात आणि शहरातील विविध भागात उघडपणे चालणाऱ्या सट्टा मटका जुगारा विरोधात उघडपणे विरोध करून पोलिस निरीक्षकांचा निषेध करून लक्ष वेधून घेतले होते. मात्र आजच्या भर बाजारपेठेतील धाडसी चोरीमुळे गुन्हेगारांमध्ये पोलिस प्रशासनाचा वचक राहिलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Back to top button