भुसावळमधील वाल्मीक नगरातील दगडफेक आणि गोळीबाराचा बनाव केल्याप्रकरणी दोन्ही गटांविरोधात गुन्हे दाखल

भुसावळ दि-19/04/25, भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील वाल्मीक नगर भागात सार्वजनिक जागी दिनांक 18/04/2025 रोजी रात्री 23.45 वाजेच्या सुमारास मध्यरात्री गैरकायदयाची मंडळी जमवून एकमेकांविरुद्द दंगल (मारामारी) करुन सार्वजनीक शांतता बिघडवल्या प्रकरणी दोन्ही गटांतील काही व्यक्तींच्या फिर्यादीवरून एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे.
यात इसम नामे 1) निखील धामणे, 2)प्रेम उर्फ गोपी धामणे, 3)आनंद खरारे, 4) अंकीत छावरीया, 5) भावेश बारसे, 6) दादु नवगीरे, 7)जय उर्फ कालु जाधव 8) बाबा घेंगट हे ” हमारे भाई संतोष बारसे को मार डाला, तुम लोगोंको आज जिंदा नही छोडें ” असे बोलून दगडफेक करीत होते. तर इसम नामे 9) आकाश रायसिंग पंडीत, 10)राज पंडीत, 11)धरमसिंग उर्फ गोलु रायसिंग पंडीत, 12) तुषार तुंडलायक, 13) अभिषेक साठे, 14) सोनु पथरोड यातील आरोपी यांनी आमचे पोलीस पथकांचे समक्ष गैरकायदयाची मंडळी जमवून एकमेकांविरुद्ध दंगल (मारामारी) करुन सार्वजनीक शांतता बिघडवली.
तसेच सदर ठिकाणी आरोपी निखील धामणे याने आकाश रायसिंग पंडीत याने बंदुकीने फायरींग केली असुन सदरची खाली केस ही तिच आहे, अशी सबब सांगून खोटा पुरावा रचण्याकामी तसेच पोलीसांचा समज व चुकीचे मत बनावे करीता सदर ठिकाणी फायरींग झाली आहे ,असे खोटे सांगुन सदर ठिकाणी खाली केस टाकुन दिली व खोटा पुरावा रचला आहे. वगैरे मजकुराचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला, असून वरीष्ठांना कळविण्यात आले आहे. वरील दोन्ही गटांचा एकमेकांविरोधात दाखल गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे आदेशानुसार पोलिस उपनिरीक्षक राजु सांगळे यांचेकडे देण्यात आला आहे .