Advertisement
जळगावपुणेमहाराष्ट्रमुंबई

मंत्री गिरीश महाजन यांनी केले नुतन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे स्वागत, पदभार स्वीकारला

जळगाव, दि. ८ ऑक्टोबर : जळगाव जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती देण्यात आलेल्या रोहन घुगे (भाप्रसे) यांनी गुरुवार दि.09 ऑगस्ट 2025 रोजी आपला पदभार स्वीकारला. तसेच राज्याचे आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आज सायंकाळी जळगाव येथे नुतन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून शुभेच्छा दिलेल्या आहेत.


यापूर्वी ते जिल्हा परिषद ठाणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा परिषदेला डिजिटल प्रशासन, शिक्षण, आरोग्य व ग्रामीण विकास या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळाले असून ‘कार्यालयीन मूल्यमापन – १०० दिवसांचा कृती कार्यक्रम’ अंतर्गत राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.


दरम्यान, माजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली नाशिक येथे झाली असून त्यांच्या जागी रोहन घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पदभार स्वीकारताना अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर व निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण उपस्थित होते.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Back to top button