महाराष्ट्रमुंबईराजकीय

महाराष्ट्रातील लोकसभा प्रचाराची नांदी,नाशकात चाललंय मोदी मोदी !! लाखो युवांचा महोत्सव व काळाराम मंदिर दर्शन

लोकसभा प्रचारांचा नारळ फुटला काळाराम मंदिरात ?

नाशिक, दि. 12 : राष्ट्रीय युवा महोत्सवाचे औचित्य साधत नाशिक दौऱ्यावर असलेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हजारो नाशिककरांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून उत्स्फूर्त स्वागत केले. प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या नाशिक येथील आगमनाने उल्हासित झालेल्या नागरिकांनी स्वागताचे फलक हाती घेत ‘भारत माता की जय’चा जयघोष करत आसमंत दुमदुमून टाकला. प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या या ‘रोड शो’ची जादू नाशिककरांवर झाल्याचं चित्र आज सगळीकडे पाहायला मिळाले.


        आज सकाळी प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे निलगिरी बाग हेलिपॅड येथे आगमन झाले. त्यानंतर हॉटेल मिर्ची चौकातून केशरी रंगाच्या आणि फुलांनी सजवलेल्या खुल्या जीपमधून श्री. मोदी यांच्या ‘रोड शो’ला प्रारंभ झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार चंद्रशेखर बावनकुळे यावेळी त्यांच्यासमवेत होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शुक्रवारी २७व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये आगमन झाले. काहीवेळापूर्वीच पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये पोहोचले. त्यानंतर निलगिरी बाग ते रामकुंडापर्यंत पंतप्रधान मोदी यांनी रोड शो केला. एरवी रोड शो किंवा अन्य कार्यक्रमात पंतप्रधान मोदी हे एकटेच केंद्रस्थानी असतात. मात्र, नाशिकमध्ये काढण्यात आलेल्या या रोड शो वेळी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत ओपन जीपमध्ये राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारचे आधारस्तंभ असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. पंतप्रधान मोदी आणि शिंदे-फडणवीस-पवार ही त्रिमूर्ती असे चित्र रोड शो वेळी पाहायला मिळाले. राज्यातील आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना तिन्ही पक्ष एकत्रितपणे सामोरे जातील, असा राजकीय संदेश या माध्यमातून देण्यात आल्याची चर्चा आहे. या वाहनात मोदींच्या एका बाजूला एकनाथ शिंदे, दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस, पाठीमागच्या बाजूला अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उभे होते. यावरुन अनेक राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. अनेकदा अजित पवार हे भाजपसोबतच्या कार्यक्रमांना उपस्थित राहत नसल्याची चर्चा होते. परंतु, पंतप्रधान मोदी यांच्या नाशिक दौऱ्यात अजित पवार हे आवर्जून उपस्थित होते.नाशिकच्या लाखो युवा वर्गाने केलेली गर्दी, महिला वर्गाचा प्रचंड प्रतिसाद, दुतर्फा सजलेले रस्ते अशा वातावरणात तपोवनाच्या दिशेने निघालेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना ठिकठिकाणी आपुलकी आणि प्रेमाने केलेल्या स्वागताचा अनुभव आला. उपस्थितांच्या दिशेने हात उंचावत तसेच उपस्थितांना अभिवादन करत प्रधानमंत्री श्री. मोदी यांचा ताफा तपोवनकडे निघाला. जागोजागी हजारोंच्या संख्येने थांबलेले नाशिककर आपल्या प्रधानमंत्र्यांचे स्वागत उत्साहात करत होते.
     लेझिम पथक, ढोलपथक, पारंपरिक वाद्ये यांच्या साहाय्याने आणि नृत्य करत विविध पथके या मार्गावर प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे स्वागत करत होती. प्रधानमंत्री श्री. मोदी यांना जवळून पाहण्याची उत्सुकता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती. लेझिम पथक, ढोल पथक आणि विविध वेशभूषेतील युवक युवतींनी सारा परिसर जणू चैतन्याने भरून गेला होता. प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे आगमन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने परिसरातील वातावरण चैतन्याने भारून गेले. हॉटेल मिर्ची ते तपोवन पर्यंतच्या संपूर्ण रस्त्यावर केवळ आणि केवळ अमाप उत्साह, चैतन्य, आनंदाचे वातावरण होते. हातात तिरंगा घेऊन  आणि भगवे झेंडे हाती घेत युवकांनी प्रधानमंत्री श्री मोदी यांचे स्वागत केले. त्याचबरोबर विविध ठिकाणच्या युवा मंडळांनी मल्लखांब प्रात्यक्षिके, पारंपरिक कलांचा आविष्कार यावेळी सादर केला. त्र्यंबकेश्वर येथून आलेल्या आणि बाल वारकऱ्यांचा समावेश असलेल्या दिंडीने विशेष लक्ष वेधले. आदिवासी आणि पारंपरिक लोकनृत्य, पंजाबी नृत्य अशा विविध पद्धतीने आणि विविध रंगी वेशभूषा करून नागरिकांनी प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे स्वागत केले.
ऐतिहासिक काळाराम मंदिरातील भगवान श्रीरामाचे
   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतले दर्शन
       सीयावर रामचंद्र की जय घोषणांनी काळाराम मंदिर परिसर दुमदुमला नाशिक, दि. 12 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात जावून भगवान श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्या हस्ते काळाराम मंदिरात विधीवत पूजा व आरती करण्यात आली.
   यावेळी काळाराम मंदिर संस्थानचे मुख्य महंत व विश्वस्त यांच्यातर्फे प्रधानमंत्री श्री. मोदी यांचा भगवान श्रीरामाची चांदीची प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
      काळाराम मंदिराचे मुख्य महंत आचार्य महामंडलेश्वर सुधीरदास महाराज, श्री काळाराम मंदिर संस्थानचे विश्वस्त धनंजय पुजारी, मंगेश पुजारी, नरेश पुजारी, मंदार जानोरकर, एकनाथ कुलकर्णी, पं. प्रणव पुजारी, अद्वय पुजारी तसेच वारकरी आणि संत परिवारातील मान्यवर उपस्थित होते.
      याप्रसंगी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या समोर अभंग आणि भावार्थ रामायणातील 8 व्या अध्यायाचे (श्लोकांचे) (ज्यामध्ये प्रभू श्रीराम यांचा नाशिकमधील वास्तव्याचा उल्लेख आहे), वाचन करण्यात आले. यावेळी मंदिर परिसरात उपस्थित महंत, वारकरी आणि गड संत कुटुंबातील वंशज यांच्याशी प्रधानमंत्री महोदयांनी संवाद साधला.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button