इंदूर (ECI)दि-५जून, काल देशभरातील सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणूकिचा निकाल लागलेला असून अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागलेले दिसून येत आहे. भाजपला देशातील अनेक राज्यांमध्ये मोठं नुकसान झालेलं असताना दुसरीकडे मात्र मध्य प्रदेशात भाजपाने शिवराजसिंग चौहान यांच्या नेतृत्वात लोकसभेच्या 29 पैकी 29 जागा जिंकत मोठा विक्रम केलेला आहे. त्यांच्या यशाची टक्केवारी ही 100% टक्के आहे. तर दुसरीकडे मोदी-शाहांच्या गुजरातमध्ये मात्र यावेळी दोन जागा काँग्रेसने जिंकलेल्या आहेत.आसाममधील धुबरी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार रकिबुल हुसैन यांनी तब्बल 10 लाख 12 हजार 476 मतांनी ऐतिहासिक विजय प्राप्त केला आहे. मध्यप्रदेशातील इंदूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार आणि विद्यमान खासदार शंकर लालवाणी यांनी तब्बल 10 लाख 8 हजार 77 अशा विक्रमी मतांच्या फरकाने जिंकलेली आहे. मध्य प्रदेशातील कोणत्याही भाजप उमेदवाराचा हा सर्वात मोठा विजय झालेला आहे. विशेष म्हणजे NOTA दोन लाखांहून अधिक मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंदूरमधून काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती बम यांनी शेवटच्या क्षणी आपला उमेदवारी अर्ज अचानक मागे घेतला होता. त्यानंतर काँग्रेस सह विरोधी पक्षांनी या ठिकाणी प्रचंड गदारोळ करून निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलेला होता. काँग्रेसचा उमेदवार नसल्यामुळे इंदूरमध्ये शंकर लालवानी आणि भाजपसाठी ही लढाई अत्यंत सोपी झाली होती. काँग्रेस समर्थकांनी निवडणुकीदरम्यान NOTA चा प्रचार केला होता. इंदूर हा भाजपचा बालेकिल्ला असून भाजपने 1989 पासून इंदूर लोकसभेची जागा ताब्यात ठेवली आहे. लालवाणीपूर्वी, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुमित्रा महाजन यांनी 1989 पासून सलग 2019 पर्यंत या ठिकाणाहून विजय मिळवलेला आहे. त्यांनी 2014 ते 2019 या काळात लोकसभा अध्यक्ष म्हणूनही काम केले होते. काँग्रेस उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्याने त्यांनी देखील नाराजी व्यक्त केलेली होती.
शिवराजमामांचा विक्रमी विजय
पूर्वी भाजपच्या ज्येष्ठ महिला नेत्या सुषमा स्वराज यांचा परंपरागत लोकसभा मतदारसंघ असलेल्या विदिशा लोकसभा मतदारसंघातून यावेळी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता. शिवराजमामांनी आपला जलवा दाखवत भाजपकडून देशात सर्तवाधिक म्हणजे तब्बल 8 लाख 21,408 एवढ्या प्रचंड मताधिक्याने निवडून येण्याचा विक्रम केलेला आहे. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रकाश भानू शर्मा यांचा पराभव केलेला आहे. गेल्या वर्षी त्यांना भाजपच्या सर्वोच्च अशा संसदिय कार्यकारी समितीतून वगळण्यात आले होते. तरीही त्यांनी न डगमगता नाराज नव्हता पक्षाला आपले काम दाखवून दिलेले आहे.
मध्य प्रदेशात भाजपच्या अनेक उमेदवारांनी मोठ्या फरकाने विजय मिळवलेला आहे.
खाली देशातील सर्वात जास्त मताधिक्य घेऊन जिंकलेल्या उमेदवारांची यादी दिलेली आहे, जे 5 लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले आहे.यात सर्वाधिक उमेदवार हे मध्यप्रदेशातील आहेत.
यात शेवटी मिळालेले मताधिक्य लाखांमध्ये. 1) रकिबुल हुसैन (धुबरी)-10,12, 476
2) शंकर ललवाणी (इंदूर)- 10,08,077 3)शिवराजसिंह चौहान (विदिशा)- 8,21,408. 4) चंद्रकांत पाटील (नवसारी)- 773551
5) अमित शहा(गांधीनगर)- 7,44,716. 6)अभिषेक बॅनर्जी (डायमंड हार्बर)- 7,10,930
7)महेश शर्मा (गौतम बुद्ध नगर) -559472
7)विष्णू दत्त शर्मा (खजुराहो)- 540929
8)सुधीर गुप्ता (मंदसौर) – 500655
9)आलोक शर्मा (भोपाल) -501499