शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लोकसभेसाठी १७ उमेदवार घोषित
मुंबई, दिनांक 27 मार्च, आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोकसभा 2024 च्या निवडणुकांसाठी राज्यातील १७ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवारांची घोषणा केलेली आहे. या यादीत एकूण १७ जागांवर उमेदवारांची नावे असून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
१) बुलढाणा- नरेंद्र खेडेकर.
२) यवतमाळ वाशीम -संजय देशमुख
३)मावळ- संजोग वाघेरे पाटील
४) सांगली – चंद्रहार पाटील
५) हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर
६) संभाजीनगर- चंद्रकांत खैरे
७)धाराशिव – ओमराजे निंबाळकर
८) शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे
९) नाशिक – राजाभाऊ वाजे
१०) रायगड – अनंत गीते
११) सिंधुदुर्ग रत्नागिरी – विनायक राऊत
१२) ठाणे -राजन विचारे
१३) मुंबई ईशान्य -संजय दिना पाटील
१४) मुंबई दक्षिण- अरविंद सावंत
१५) मुंबई वायव्य-अमोल कीर्तिकर
१६) परभणी – संजय जाधव
१७) दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई
हे १७ उमेदवार घोषित केलेले असले तरीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा काही मोजक्या जागांवरील तिढा मात्र कायम आहे.तो आज रात्री पर्यंत सुटू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यानंतर आजच दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार गटातर्फे ही त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.