अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीर

जळगाव, दि-02/04/25, : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मार्फत , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने समता पंढरवडा आयोजित करण्यात येत आहे. हा उपक्रम ०१ एप्रिल २०२५ ते १4 एप्रिल २०२५ या कालावधीत ‘समता पंढरवडा’ म्हणून राबविण्यात येणार आहे.
समता पंढरवडा अंतर्गत, सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये, महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जातीच्या प्रमाणपत्रांची पडताळणी तालुका व महाविद्यालय निहाय सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचे मार्फत करण्यात येणार आहे. समता पंढरवडा अंतर्गत, जिल्ह्यातील संबंधित महाविद्यालयांतील पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरून मूळ कागदपत्रांसह महाविद्यालयातील समन्वय अधिकाऱ्यांकडे सादर करता येतील.
समिती स्तरावरून महाविद्यालयांतील प्राप्त अर्जांवर तात्काळ कार्यवाही करून जात प्रमाणपत्र देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.तसेच, जिल्हा जात पडताळणी कार्यालयामार्फत ०३ एप्रिल २०२४ ते ०४ एप्रिल २०२४ व १० एप्रिल २०२४ ते ११ एप्रिल २०२४ या कालावधीत त्रुटी पूर्तता शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव एन एस रायते यांनी केले आहे.