Advertisement नंदग्राम गोधाम वाटरपार्क,अंजाळे
क्राईम/कोर्टपुणेमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रीय

अवैध वृक्षतोड म्हणजे मानवी हत्याकांडासारखे ! प्रती वृक्ष १ लाख रु दंड वसुल करा- सुप्रीम कोर्टाचे आदेश

वृक्षतोड म्हणजे मानवसंहारासारखे

नवी दिल्ली दि-२५/०३/२५, “मोठ्या प्रमाणात झाडे तोडणे हे माणसांच्या हत्येपेक्षा वाईट आहे, हे हलक्यात घेऊ नका, चुकीला माफी नाही ” असे परखड मत मांडत पर्यावरणाची हानी करणाऱ्यांवर दयामाया दाखवू नये, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ओका यांनी या घटनेवर तीव्र नापसंती व्यक्त केली आणि त्याची तुलना असंख्य मानवी जीवांच्या हत्येशी केली. ” ४५४ झाडे तोडण्याचे इतके निर्लज्ज कृत्य हे मोठ्या संख्येने मानवांना मारण्यासारखे आहे. किंवा त्याहूनही वाईट ,” अशी संतापजनक टिप्पणी केली आहे. बेकायदेशीरपणे कापलेल्या प्रत्येक झाडासाठी 1 लाख रुपये दंड आकारण्यास सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. यामुळे अवैध वृक्षतोड करण आता खूप महागात पडणार आहे. तसेच दंडाविरोधातील याचिकाही फेटाळण्यात आली. न्यायमूर्ती अभय एस ओका आणि न्यायमूर्ती उज्वल भुईया यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, संबंधित प्राधिकरण किंवा संस्थेची परवानगी घेतल्याशिवाय कोणतीही व्यक्ती झाड तोडू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेवर सुनावणी सुरू होती, ज्यामध्ये एका व्यक्तीने झाडे तोडल्याबद्दल दंड ठोठावण्याविरुद्ध कारवाई न करण्याची मागणी केली होती.
कायदा व झाडं हलक्यात घेता येणार नाहीत
कायदा आणि झाडे हलक्यात घेऊ शकत नाहीत आणि करू नयेत, असा स्पष्ट संदेश गुन्हेगारांना द्यायला हवा, अशी ज्येष्ठ वकील एडीएन राव यांची सूचना खंडपीठाने मान्य केली. कोर्टाने आपल्या आदेशात अशा प्रकरणांमध्ये किती दंड ठोठावायचा याचाही बेंचमार्क ठरवला आहे.
454 झाडे तोडल्यास प्रति झाड 1 लाख रुपये दंड
न्यायालयाने केंद्रीय अधिकार प्राप्त समितीचा (CEC) अहवाल स्वीकारला आहे, ज्यामध्ये शिव शंकर अग्रवाल यांना मागील वर्षी 454 झाडे तोडल्याबद्दल प्रति झाड 1 लाख रुपये (एकूण 4.54 कोटी रुपये) दंड ठोठावण्यात आला आहे. अग्रवाल यांचा खटला लढणारे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी खंडपीठाला सांगितले की, त्यांच्या अशिलाने चूक मान्य केली असून त्यांनी माफी मागितली आहे. दंडाची रक्कम कमी करण्याची विनंतीही त्यांनी न्यायालयाला केली आहे, जी खूप जास्त असल्याचे म्हटले आहे. मुकुल रोहतगी म्हणाले की, अग्रवाल यांना केवळ त्या जमिनीवरच नव्हे तर जवळपासच्या ठिकाणीही रोपे लावण्याची परवानगी द्यावी. दंडाची रक्कम कमी करण्यास न्यायालयाने नकार दिला. जवळपासच्या भागात रोपे लावण्यास परवानगी दिली.
ताज ट्रॅपेझियम झोन म्हणजे काय?
ताज ट्रॅपेझियम झोन हा ताजमहाल आणि उत्तर प्रदेशातील आग्रा येथील इतर हेरिटेज स्मारकांच्या आसपासचा 10,400 चौरस किलोमीटर संरक्षित क्षेत्र आहे. या ऐतिहासिक स्थळांना धोका निर्माण करणारे प्रदूषण आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी याची स्थापना करण्यात आली. न्यायालयाने 1996 मध्ये टीटीझेडमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचे निर्देश दिले होते.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button