क्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्रमुंबई

झुलेलाल वॉटरपार्कच्या अवैध बॅनरबाजीवर मनपा उपायुक्तांनी दिला कारवाईचा इशारा

अवैध बॅनरबाजीवर कारवाईचे संकेत

जळगाव, दि:22, जळगाव शहराबाहेर नव्याने सुरू झालेल्या झुलेलाल वॉटरपार्क यांच्या वतीने दोन दिवसांपूर्वी रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी विनापरवानगी आणि अनधिकृतपणे बॅनर लावण्यात आलेले होते. काही दिवसांपूर्वी मुंबईतील घाटकोपर भागात वादळाने कोसळलेल्या होर्डिंग्जमुळे 18 लोकांचा बळी गेलेला होता. ही घटना ताजी असतानाच राज्यातील अवैध होल्डिंग आणि बॅनरबाजीचा विषय आता ऐरणीवर आलेला आहे. तर दुसरीकडे जळगाव शहरात सार्वजनिक जागी झुलेलाल वाटरपार्कचा अवैध बॅनरबाजीचा सुळसुळाट सुरू झाल्यामुळे सोशल मीडियावर याबाबत जोरदार टिका झाल्यानंतर महापालिकेच्या पथकाने सदरील विनापरवानगी लावलेले बॅनर काढण्यासाठी पथक पाठवलेले होते. मात्र पथक पोहोचण्याआधीच सदरील बॅनर रस्त्यांवरून गायब झालेले आहेत. या अवैध आणि रस्त्याच्या कडेला लावलेल्या विनापरवानगी बॅनरमुळे अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. महापालिकेच्या पथकाकडून कारवाई होण्याची कुणकुण लागताच सदरील बॅनर लावणाऱ्या व्यक्तीने तात्काळ आपले बॅनर काढून घेतलेले आहेत. त्यामुळे जर बॅनर अवैध नव्हते तर काढण्यात का आले ? आणि वॉटर पार्क सुद्धा अवैध तर नाही ना ? त्याच्या आवश्यक असलेल्या इतर महत्त्वपूर्ण परवानग्या याबाबतही आता नागरिकांमध्ये सोशल मीडियावर साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

मनपा उपायुक्त निर्मला गायकवाड यांची प्रतिक्रिया

याबाबत मनपा उपायुक्त निर्मला गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, जे कोणी व्यक्ती विनापरवानगी आणि अवैधरित्या जळगाव शहरातील मनपा हद्दीत परवानगी मिळण्याआधीच कोणत्याही प्रकारची बॅनरबाजी किंवा होर्डिंग लावतील त्यांच्यावर तात्काळ दंडात्मक तसेच यासंदर्भात आवश्यकता भासल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, असे सांगितलेले आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या या झुलेलाल वॉटरपार्क रिसॉर्टची सध्या जळगाव शहरात चर्चा आहे. सध्या जळगाव जिल्ह्याचे तापमान हे 45°सेल्सिअस वर गेल्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी झुलेलाल वॉटरपार्कला येण्यासंदर्भातील अनेक ऑफरचे अनधिकृत बॅनर जळगाव शहर मनपा हद्दीत अनेक ठिकाणी लावण्यात आले होते. मनपा उपायुक्त निर्मला गायकवाड यांच्याशी याबाबत चर्चा केली असता संबंधित झुलेलाल वॉटरपार्कच्या मालकांनी बॅनरच्या परवानगीसाठी दिनांक 17 मार्च रोजी अर्ज करण्यात आलेला असून आजपावेतो त्यांना आमच्याकडून परवानगी मिळण्याआधी पोलीस प्रशासनाची नाहरकत परवानगी घेण्यास त्यांना सुचविले असल्याचे मनपा उपायुक्त निर्मला गायकवाड यांनी सांगितले आहे.
जळगाव शहरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला आणि सिग्नल यंत्रणेच्या खांबाला देखील अनधिकृत बॅनर लावण्यात आलेले होते. यासाठी परवानगी मिळण्याअगोदरच शहरात लावण्यात आलेले फलक काढण्यासाठी आणि त्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी मनपा प्रशासनाने पथक पाठवलेले आहे. अशा अवैध बॅनरबाजी करणाऱ्या संबंधितांवर योग्य ती दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे जळगाव मनपा उपायुक्त निर्मला गायकवाड यांनी सांगितलेले आहे.
सध्या बॅनरबाजीला परवानगी नाही- API डी.डी.इंगोले
कोणत्याही वॉटरपार्क कंपनींने किंवा त्यांच्या प्रशासनाने जळगाव शहर वाहतूक शाखेकडे बॅनर लावणे संदर्भात कोणताही अर्ज केलेला नाही. तसेच कोणत्याही वाटरपार्क किंवा इतर ठिकाणी पोहोचण्यासाठी जळगाव शहरातून परमिटपेक्षा जादा प्रवाशांची वाहतूक झाल्याचे आढळून आल्यास संबंधित वाहनांवर दंडात्मक कायदेशीर कारवाई करण्यात येईल,अशी माहिती जळगाव शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक देविदास इंगोले यांनी ‘मिडियामेल न्यूज’ शी बोलतांना दिलेली आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button