जळगावमहाराष्ट्रमुंबईराजकीय
Trending

जळगावचे खा.उन्मेष पाटील यांचं तिकीट कापलं जाणार का ? नेमकं काय म्हणाले उन्मेष पाटील,बघा हि धक्कादायक प्रतिक्रिया

जळगाव | 25 सप्टेंबर 2023 : मुंबईत नुकतेच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज्यातील आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात चर्चा केली होती. या चर्चेत राज्यातील काही जागांवर उमेदवार बदलण्या संदर्भात चर्चा झाल्याची बातमी सर्व प्रथम mediamail.in ने सुत्रांच्या हवाल्याने दिली होती. आता त्या संदर्भात विविध चर्चांना उधाण आलेलं असून या संदर्भात जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
        जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मुंबईतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर झालेल्या बैठकीत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचे नाव जाहीर झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच लोकसभेचे तिकीट कापलं जाणार असणार असल्याची चर्चा रंगायला लागली आहे. उन्मेष पाटील हे नुकतेच दहीहंडीच्या कार्यक्रमामुळे चर्चेत आले होते. रात्री दहा वाजेनंतर डीजेवर बंदी असताना त्यांनी पोलिसांना गर्दीचा धाक दाखवत नियमांचं उल्लंघन केलं होतं. हे प्रकरण प्रचंड तापलं होतं. त्यानंतर आता पुन्हा उन्मेष पाटील चर्चेत आले आहेत. त्यांचं आता तिकीटच कापलं जाणार असल्याची चर्चा सोशल मीडियात जोर धरताना दिसत आहे.
  खासदारकीच्या काळात मी जिल्ह्यात अनेक विकासकामे केली. देशातल्या टॉप टेन खासदारांमध्ये मी सुध्दा होतो. आमचा पक्ष प्रचंड हुशार आणि चाणाक्ष आहे. त्यामुळे माझी कामगिरी लक्षात घेवून पक्ष योग्य तो निर्णय घेईल. मी खासदार म्हणून जी जबाबदारी पार पडली, त्यानंतरही पक्ष, पक्षाचे वरिष्ठ नेते जो काही निर्णय घेतील, तो मला मान्य राहील. त्या निर्णयाशी मी बांधिल राहिल, असे खासदार उन्मेष पाटील यांनी आता म्हटलेलं आहे.

उन्मेष पाटील राष्ट्रवादीत जाणार ?

    खासदार उन्मेष पाटील यांनी एकप्रकारे उज्ज्वल निकम यांच्या उमेदवारीबाबतच्या पक्षाच्या निर्णयावर अप्रत्यक्षरित्या नाराजी व्यक्त केलीय. दरम्यान, लोकसभेची उमेदवारी न मिळाल्यास उन्मेष पाटील हे भाजपसोडून राष्ट्रवादीत जाणार असल्याची सोशल मिडियावर चर्चा आहे. यावर खासदार उन्मेष पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की,खासदारकी हि मिरवण्यासाठी नसते, तर जनहिताची कामे करण्यासाठी जनता खासदार निवडून देते.माझा पक्ष बदलण्याचा निर्णय मुळीच नाही. कुणीतरी काहीतर वावड्या उठवित आहे. झारीतले शुक्राचार्य या प्रकाराला वेगळ रुप देण्याचा प्रयत्न करत असतील, पण मी भाजपचा एक प्रामाणिक सैनिक म्हणून काम करतोय आणि करत राहिल, अशी स्पष्ट भूमिका उन्मेष पाटील यांनी मांडलेली आहे.
   प्रसिद्ध व जेष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांच्याशी माझे कौटुंबिक संबंध आहेत. ते आमचे कायम विधी सल्लागार व मार्गदर्शक आहेत. ते सुद्धा लोकसभेच्या उमेदवारीबाबत त्यांची भूमिका मांडतील, असं उन्मेश पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता उज्ज्वल निकम काय भूमिका मांडतात ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भाजप उज्ज्वल निकम यांना खरंच लोकसभेचं तिकीट देणार का ? खरंच तिकीट दिल्यानंतर काय-काय घडामोडी घडतात ? हे आगामी काळात बघायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र यासंदर्भात जिल्ह्यात सोशल मीडियावर चर्चा रंगलेल्या दिसत आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button