झेंडे दाखवायचा धंदा आमचा, मंत्री गुलाबराव पाटील यांचे हजारो लाडक्या बहिणींसमोर जळगावात तुफानी भाषण
जळगाव,दि-१३/०८/२०२४, महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ अशी ओळख असलेल्या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज जळगावातील सागर पार्क मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमात आपल्या छोटेखानी खणखणीत वकृत्वाच्या भाषणाने उपस्थित चाळीस हजार लाडक्या बहिणींची वाहवा मिळवली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यातील मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत लाखो महिलांनी अर्ज दाखल केले असून त्यातील प्रस्ताव मंजूर झालेल्या सर्व महिलांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने खास भेट मिळणार आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा जळगावात दाखल झाल्यानंतर काही तथाकथित लोकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवून विरोध करण्यासाठी प्रयत्नात होते. मात्र पोलिसांनी त्यांचा प्रयत्न उधळून लावला आहे. त्यावर पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, काही लोकांनी झेंडे दाखवायचा प्रयत्न केला, मात्र तो धंदा आमचा आहे,त्यांचा नाही,असे खणखणीत आवाजात प्रत्युत्तर दिलेलं आहे.
तसेच जळगाव जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण, चोपडा, मुक्ताईनगर, भुसावळ या तालुक्यातील लोकहितासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेले प्रलंबित प्रकल्प आणि योजनांच्या कोट्यवधींच्या निधीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसमोर जोरदार मागणी केलेली आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, मंत्री अनिल पाटील, खा.स्मिता वाघ, आमदार सर्वश्री संजय सावकारे, सुरेश भोळे, चंद्रकांत पाटील, चिमणराव पाटील, किशोर पाटील, मंगेश चव्हाण, लताताई सोनवणे यांचेसह अंदाजे चाळीस हजार महिला उपस्थित आहेत.