लाडक्या बहिणींना मंडपात जागा नाही,पोलीस प्रशासनाची दमछाक, महिला उन्हात ताटकळत, मुख्यमंत्री शिंदेचे आगमन
स्वयंस्फूर्तीने हजारो महिला दाखल
जळगाव,दि-13/08/2024,आज जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह 12 खात्यांचे मंत्री आणि पालकमंत्री यांच्यासह उपस्थिती आहे.जिल्हाभरातून तब्बल पन्नास हजार महिला आज सागर पार्क मैदानावर दाखल झालेल्या आहेत. मात्र मैदानाची क्षमता ही चाळीस हजार असल्याने जिल्हाभरातून स्वयंस्फूर्तीने आलेल्या अतिरिक्त हजारो महिला या मंडपाच्याबाहेरच भरउन्हात तब्बल दोन तासांपासून ताटकळत उभ्या आहेत. मंडपात बसायला जागा शिल्लक नसल्याने या महिलांना मंडपात बसायला मिळाले नसल्याने त्यांनी बाहेरच रस्त्यावर ठाण मांडलेले आहे.त्यांना पोलीस प्रशासन वारंवार लाऊडस्पिकरच्याद्वारे उद्घोषणा करून सूचना करावी लागत आहे.
यातच मुख्य प्रवेशद्वारावर दोन पोलिसांनी त्यांच्या जवळच्या काठीवर एक लाऊडस्पिकर ठेवून त्याला टेकू दिल्याने ते दृष्य चर्चेचा विषय ठरलेला आहे.आताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेसह सर्व प्रमुख मंत्री, पालकमंत्री, महायुतीचे आमदार, खासदार, जिल्हाधिकारी ,पोलिस व जिल्हाप्रशासन मोठ्या फौजफाट्यासह दाखल झाले आहेत.