मुंबईराजकीय

देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छा बॅनर वरून भाजपचे अमित शाह गायब, फडणवीस हे अमित शाहांवर नाराज आहेत का ? दिल्ली वारीत घडलयं काय ?

मुंबई, 1 जुलै : विधान परिषदेच्या निकालानंतर सुरू झालेल्या सत्तासंघर्षात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदी आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदी विराजमान होतील अशी दाट शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र प्रत्यक्षात पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित केलं. स्वत: मात्र मंत्रिमंडळातही नसणार असल्याचं सांगितलं. यानंतर अनेकांच्या चेहऱ्याचा रंगच बदलला होता.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिल्लीतून फडणवीसांनी मंत्रिमंडळामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले.तसेच पक्षश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रिपद घेऊन मंत्रिमंडळात राहण्याचे आदेश दिले, यानंतर मात्र अनेकांना धक्का बसला होता.मात्र खरा प्रश्न हा उभा राहिलेला आहे की, देवेंद्र फडणवीसांचे पंख खरच कोणी छाटले का ?

होर्डिंग्जवरून गृहमंत्री अमित शाह “गायब”

मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांना न मिळाल्याने राज्यातील भाजप नेत्यांमध्ये असलेली नाराजी उघड झाली आहे. त्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तर नागपुरातील देवेंद्र फडणवीस यांच्या होर्डिंगवरून केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते अमित शाह यांचे फोटो गायब झाले आहेत. नागपुरात फडणवीसांचे होर्डिंग लावणारे भाजपचे माजी महापौर आणि देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक संदीप जोशी यांनी हे होर्डिंग लावलेलं आहे.यामुळे फडणवीसांना भाजपमध्ये दाबण्याचा प्रयत्न केला जातोय का ? असाही सवाल उपस्थित केला जाऊ लागला.

अमित शाहांचा फोटो गायब असलेले होर्डिंग


मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने देवेंद्र फडणवीस हे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईत आज भाजपकडून जल्लोष केला. आज मुंबईत भाजपच्या कार्यालयात झालेल्या जल्लोष समारंभात देखील देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिलेले नाहीत.

Advertisement by sponsered

विधान परिषदेच्या निकालानंतर शिवसेनेचे अनेक आमदार सुरतला रवाना झालेले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली वाऱ्या सुरू झालेल्या होत्या. गेल्या दहा दिवसात त्यांनी विविध फेऱ्या करून पाच दिवस हे दिल्ली दरबारी काढले. मात्र राजकीय भूकंपाच्या घडामोडींवर किंवा शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या बाबतीत अशा कोणत्याच बाबींवर त्यांनी शेवटपर्यंत ‘ब्र’ सुद्धा काढलेला नव्हता. त्यामुळे त्यांनी बाळगलेले मौन हे त्यांची दिल्ली दरबारी मुख्यमंत्री होण्याची ‘निराशा’ झाल्याचे तर द्योतक नव्हते ना ? अशी शंका आता उपस्थित केली जात आहे.भाजपचे संख्याबळ पाहता फडणवीस हे मुख्यमंत्रीपदासाठी दावेदार असताना त्यांचे पंख अमित शहा यांनीच तर छाटले नाहीत ना ? की 11 जुलै रोजी बंडखोर 16 आमदारांच्या सर्वोच्च न्यायालयात लागणाऱ्या निकालावरून अमित शाह यांना धाकधूक होती ? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहे.

हे पण वाचा :महाराष्ट्राचा “शॅडो मुख्यमंत्री” कोण होणार


नितीन गडकरी अलिप्त होते का ?
महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षावर गेल्या 10 दिवसात दिल्लीत भाजपच्या पक्षश्रेष्ठींसोबत फडणवीसांच्या 5-6 बैठका झाल्या, मात्र याबाबत भाजपचे महाराष्ट्रातील जेष्ठ नेते व अमित शाहांचे भविष्यातील प्रतिस्पर्धी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कुठेही विचारात घेतले गेले नाही का ? की त्यांना केंद्रातून राज्यात पाठविण्याची अमित शाहांची योजना होती.असेल तर तिला गडकरींनी नकार दिलेलाच असेल. म्हणजेच अमित शाहांना फडणवीस मुख्यमंत्री म्हणून नको होते का ? म्हणूनच फडणवीस मध्यंतरी घडामोडींवर मौन बाळगून होते का ? अशी शक्यता आता वाटू लागली आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.