क्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्रमुंबईराजकीय

१३७ कोटींच्या कथित उत्खनन घोटाळ्याप्रकरणी खडसे कुटुंबीयांना औरंगाबाद खंडपीठाची नोटीस

याप्रकरणी भुसावळचे तत्कालीन प्रांताधिकारी निलंबित झालेले आहे

जळगाव: दि ९ एप्रिल, पूर्वाश्रमीचे भाजप नेते आणि विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरु झालेल्या आहेत. एकनाथराव खडसे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं गेल्या काही वर्षातील वैर सर्वश्रूत आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी एकनाथराव खडसे यांनी ते आता भाजपात घरवापसी करणार असल्याची घोषणा केलेली असून येत्या पंधरा दिवसात त्यांचा दिल्लीत मोठ्या थाटामाटात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाध्यक्ष जयप्रकाश नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपात भव्य पक्षप्रवेश होणार आहे. मात्र एकनाथराव खडसे हे राज्यातील कोणत्याही शहरात पक्षप्रवेश का करत नाही, असा प्रश्न दोन दिवसांपासून चर्चिला जात आहे. याला कारण आहे ते राज्यातील भाजपचे शीर्ष नेतृत्व असलेले देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच खडसेंचा दिल्लीत पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. एकेकाळी एकनाथराव खडसेंचे जुनिअर असलेले देवेंद्र फडणवीस आज राज्यातील भाजपचे शीर्ष नेतृत्व म्हणून ओळखले जाते.


त्यामुळे खडसेंच्या भाजपातील प्रवेशावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया महत्वाची मानली जाते. भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या एकनाथ खडसे यांची भाजपमध्ये परतण्याची इच्छा व्यक्त आहे. त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘खडसे यांनी अजून अधिकृतरीत्या कळविलेले नाही. मात्र ज्यावेळेस इकडे येतील त्यांचे आम्ही स्वागतच करू. मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कोणीही भाजपत प्रवेश करीत असेल त्याचे स्वागतच असेल.’’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांमुळे महायुतीच्या उमेदवारांच्या मतांमध्ये अधिक वाढ होईल, असेही फडणवीस म्हणालेले आहेत.
त्यातच आता एका प्रकरणात खडसेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. खडसेंचे कट्टर राजकीय वैरी असलेले मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सातोड शिवारातील कथीत अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी कारवाईला विशेष तपास पथकाने अर्थात (एसआयटी ) ने स्थगिती दिल्याच्या अहवालाच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
माजी महसूलमंत्री राहिलेल्या आमदार एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड शिवारातील राष्ट्रीय महामार्गात असलेल्या अकृषक भूखंडातून पदाचा दुरुपयोग करत कथीतरीत्या १३७ कोटींचा अवैध गौण खनिज उपसा केल्याचा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधान सभेत केलेला होता. त्यानंतर या प्रकरणात सरकारकडून ‘एसआयटी’ स्थापन करण्यात आली होती. एसआयटीच्या जबाबात खडसे कुटुंबीयांनी आम्हाला नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार न्याय मिळावा आणि विशेष तपास पथकाने एकतर्फी कारवाईचा अहवाल करू नये अशी विनंती केली होती.त्यानंतर खडसे कुटुंबीयांना दिलासा देत ‘एसआयटी’ने सादर केलेल्या अहवालाला स्थगिती देण्यात आलेली आहे. या स्थगिती विरोधात आमदार चंद्रकांत पाटील यांनी गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र विठ्ठलराव घुगे आणि न्यायमूर्ती संजय देशमुख यांच्या खंडपीठाने या प्रकरणी राज्याचे मुख्य प्रधान सचिव नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे आणि जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि भुसावळचे उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांना या प्रकरणी नोटीस बजावलेली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी विधानसभेत आमदार पाटील यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तात्काळ आदेश देत दोन दिवसांनी भुसावळचे तत्कालीन प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी आणि पदाचा गैरवापर केल्या प्रकरणी शिस्तभंगाचा ठपका ठेवत तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. आता औरंगाबाद खंडपीठात याप्रकरणी ३० एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे. ऐन निवडणुकांच्या धामधुमीत आता खडसे कुटुंबियांची डोकेदुखी वाढलेली आहे. एकनाथराव खडसेंच्या स्नुषा रक्षा खडसे यांना रावेर लोकसभेसाठी भाजपकडून उमेदवारी मिळालेली आहे.

Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button