Advertisement नंदग्राम गोधाम वाटरपार्क,अंजाळे
अर्थकारणमहाराष्ट्रमुंबईराजकीय

पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी शासनाचे सर्वतोपरी सहकार्य -वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे

मुंबई,दि. 23/05/2025-  पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्रात विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर, जालना शहरात पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारण्यात येत आहे .या स्मारकामुळे जालना शहर पर्यटन आणि सांस्कृतिक केंद्र म्हणूनही ओळखले जाईल, या स्मारकासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही  वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिली.
 जालना  शहरातील अंबड चौफुली परिसरात उभारण्यात येत असलेल्या राजमाता  पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाची  वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी पाहणी केली.  या प्रसंगी आमदार  नारायण कुचे, भास्कर आबा दानवे, बद्रीनाथ पठाडे, भगवान मात्रे, स्मारक समितीचे अध्यक्ष कपील दहेकर, सचिव शांतीलाल बनसोडे, कोषाध्यक्ष बाळासाहेब अबुज, सदस्य तुकाराम कोल्हे, एस. एस. दहेकर, प्रा. गणेश गुंजाळ, साहित्यिक पंडित तळेगावकर, श्री. कुरधने, श्री.काळे उपस्थित होते.
 मंत्री संजय सावकारे पुढे म्हणाले की, जालना शहराचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा समृद्ध करणारे 24 फूट उंचीचे हे स्मारक देशातील सर्वात उंच पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक ठरणार असून वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारे आहे.  या स्मारकाच्या पार्श्वभूमीला ऐतिहासिक महेश्वर किल्ला आणि इंदूर राजवाड्याच्या संकल्पनेचा मिलाफ साधणारी 28 फूट उंच आणि 56 फूट रुंद दगडी भिंत उभारली जाणार आहे. ही भिंत स्मारकाचे विशेष आकर्षण ठरणारी आहे. या भव्य प्रकल्पासाठी व सुशोभीकरणासाठी  शासन सकारात्मक आहे.
 स्मारक समितीचे अध्यक्ष कपील दहेकर म्हणाले, हे स्मारक  पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आणि त्यांच्या समाजसुधारणेच्या विचारांचा गौरव आहे. यामुळे जालना शहराचे सांस्कृतिक वैभव वाढेल आणि भावी पिढ्यांना प्रेरणा मिळेल.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button